Home | Business | Gadget | How To Turn Your Photos Into WhatsApp Stickers

WhatsApp वर आपल्या नावाचे स्टीकर बनवणे आहे सोपे, या 2 फ्री अॅप्सची आहे गरज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

स्वतःच्या फोटोचे व्हॉट्सअप स्टीकर असे बनवा

 • How To Turn Your Photos Into WhatsApp Stickers

  गॅजेट डेस्क. या दिवाळीला लोकांनी व्हॉट्सअपवर इमोजी आणि GIF ऐवजी स्टीकर शेअर केले आहेत. हे खुप अॅट्रॅक्टिव्ह आहेत. हे डाउनलोड करण्याचीही गरज नाही. एवढेच नाही, तर अनेक लोकांनी आपल्या नावाचे किंवा फोटोंचे स्टीकरही शेअर केले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा हा एकदम वेगळा अंदाज आहे.


  - पण हे आपल्या नावाचे आणि फोटोंचे स्टिकर कसे तयार करावे हे अनेक लोकांना माहित नाही. कारण डिफॉल्ट स्टीकरमध्ये यूजरला हे ऑप्शन मिळत नाही. अशावेळी आम्ही तुम्हाला स्टिकर बनवण्याची ट्रिक सांगणार आहोत.

  2 अॅप्सची आहे गरज
  व्हॉट्सअपवर आपल्या नावाचे स्टिकर बनवण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये Background Eraser आणि Personal stickers for WhatsApp नावाचे 2 अॅप्स इन्स्टॉल करावे लागतील. अँड्रॉइड यूजर्स हे अॅप प्ले स्टोरमधून फ्री इन्स्टॉल करु शकता.


  1. Background Eraser
  या अॅपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही फोटोचे बॅकग्राउंड हटवू शकता. अॅपमध्ये फोटो क्रॉप करण्यासोबतच, ते इरेज करण्याचे ऑप्शन मिळते. फोटोच्या बॅकग्राउंड ऑटो, मॅनुअल, मॅजिक, रिपेयर टूलच्या मदतीने सहज मिटवता येऊ शकते. फोटो इरेज केल्यानंतर तो सेव्ह करुन घ्या.
  जर तुम्ही अॅपमधून फोटोचे बॅकग्राउंड डिलीट करु शकला नाहीत. तर ते कम्प्यूटर किंवा फोटोशॉप किंवा दूस-या सॉफ्टवेअरच्या मदतीने इरेज करा. यानंतर फोटो PNG फॉर्मेटमध्ये सेव्ह करा. अशा प्रकारे तुम्ही फोटो किंवा नावाचे कमीत कमी 3 स्टीकर तयार करा. हे फोटोज स्टीकरचे काम करतील.


  2. Personal stickers for WhatsApp
  तुम्ही हे अॅप ओपन केले तर PNG फॉर्मेटमध्ये सेव्ह असलेल्या सर्व फाइल तुम्हाला दिसतील. तुम्ही तयार केलेले फोटोही तुम्हाला येथे दिसतील. तुम्हाला या फोटो समोर ADD वर टॅब करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर एक विंडो येईल यावर पुन्हा एकदा ADD करा. अशा प्रकारे तुम्ही तयार केलेले स्टीकर्स व्हॉट्सअपवर पोहोचतील.

  स्टीकर सेंड करण्याची प्रोसेस
  - व्हॉट्सअप ओपन करुन तुम्हाला ज्यांना हे स्टीकर सेंड करायचे आहे त्या चॅटवर जा.
  - आता टायपिंग स्पेसवर दिलेल्या स्माइलीवर टॅब करा.
  - येथे सर्वात खालच्या बाजूला स्माइलीसोबत GIF आणि स्टीकरचा लोगो दिसेल.
  - स्टीकरच्या लोगोवर टॅब करा आणि वर दिलेल्या लिस्टमध्ये तयार केलेले स्टीकर सिलेक्ट करा.
  - स्टीकरवर टॅब करताच ते सेंड होईल.


  हे आहेत ते अॅप्स
  Personal stickers for WhatsApp
  Background Eraser

Trending