आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैवाहिक जीवनातील सुख कायम राहण्यासाठी करावी या देवी-देवतांची पूजा; अडचणी होतील दूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन मंत्र डेस्क - हिंदू धर्मात अनेक प्रकारतचे देवी-देवता सांगण्यात आले आहेत. देवाच्या या सर्व रूपांचे वेगवेगळे महत्व आहे. भक्ताने अंतकरणाने देवाची प्रार्थना केल्यास देव त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असे मानले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मांच्या मते, आपल्या मनोकामनांनुसार देवाची पूजा केली तर सकारात्मक फळ लवकर मिळू शकते. येथे जाणून घ्या कोणत्या मनोकामनेसाठी कोणत्या देवाची पूजा करावी.


> वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी, लग्नाच येणाऱ्या अडचणींपासून मुक्ती मिळविण्यासाठी, पती-पत्नीतील प्रेम आणि सुख कायम राहण्यासाठी शिव-पार्वती, लक्ष्मी-विष्णू, सीता-राम, राधा-कृष्ण आणि श्रीगणेश यांची पूजा करावी.


> पैशांसंबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी देवी महालक्ष्मी, कुबेर देव, भगवान विष्णू यांची पूजा करावी.


> कष्ट केल्यानंतरही यश मिळत नसेल तर कोणत्याही कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पुजेने करावी.


> कोणती भीती सतावत असेल किंवा मन अशांत असेल तर हनुमानाचे ध्यान करा. पती-पत्नी दुरावले असतील आणि अनेक प्रयत्न करूनही मिलनाचे योग बनत नसतील तर हनुमानाची पूजा करावी. कारण सीता आणि श्रीराम यांचे मिलन हनुमानाच्या मदतीने झाले होते. यामुळे यांची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होते.


> शिक्षणासंबंधीत अडचणी दूर करण्यासाठी सरस्वती मातेचे ध्यान करा आणि बल, बुद्धी, विद्याचे दाता हनुमान आणि श्रीगणेश यांची पूजा करावी.