Home | Jeevan Mantra | Dharm | How To Worship To Lord Shani

शनिवारी संध्याकाळी या 3 पैकी कोणत्याही एका ठिकाणी लावावा दिवा, दुर्भाग्य होऊ शकते दूर

रिलिजन डेस्क | Update - Aug 04, 2018, 12:43 PM IST

ज्योतिषमध्ये सातही दिवसाचे वेगवेगळे कारक ग्रह सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनि

 • How To Worship To Lord Shani

  ज्योतिषमध्ये सातही दिवसाचे वेगवेगळे कारक ग्रह सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनिवारचा कारक ग्रह शनी आहे. शनिदेवाला न्यायाधीश मानले गेले आहे. हा ग्रह आपल्याला आपल्या कर्माचे फळ प्रदान करतो. येथे जाणून घ्या, शनिवारी कोणकोणते उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतात...


  # दिवा लावावा
  शनिवारी संध्याकाळी एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा हनुमान मंदिरात किंवा देवघरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा उच्चार करून हनुमान चालीसाचा पाठ करावा. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि यामुळे धन संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.


  # शनिदेवाला निळे फुल अर्पण करावे
  प्रत्येक शनिवारी शनिदेवाला निळे फुल अर्पण करून ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


  # पिंपळाला जल अर्पण करावे
  प्रत्येक शनिवारी सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर पिंपळाला जप अर्पण करून सात प्रदक्षिणा घालाव्यात. जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • How To Worship To Lord Shani

  # तेलाचे दान करावे 
  शनिवारी सकाळी-सकाळी स्नान केल्यानंतर तेलाचे दान करावे. यासाठी एक वाटीमध्ये तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा, त्यानंतर तेल एखाद्या गरिबाला दान करावे.

 • How To Worship To Lord Shani

  # हनुमानाला शेंदूर अर्पण करावा 
  मान्यतेनुसार हनुमानाची पूजा करणाऱ्या भक्तांवर शनीचा अशुभ प्रभाव राहत नाही. यामुळे शनिवारी हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. हनुमान चालीसाचा पाठ करावा.

Trending