आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यापासून भांगपर्यंत, महादेवाला प्रिय आहेत या 10 गोष्टी; यामुळे दूर होतील सर्व समस्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 12 ऑगस्टपासून महादेवाचा पूजेचा विशेष मास श्रावण सुरु झाला आहे. हा मास 9 सप्टेंबरपर्यंत राहील. तुम्हाला या काळात महादेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास शिवलिंगावर काही खास गोष्टी अर्पण करू शकता. शिवपुराणानुसार या संपूर्ण सृष्टीची रचना महादेवाच्या आज्ञेने ब्रह्मदेवांनी केली आहे. महादेवाच्या पूजेने सर्व देवता प्रसन्न होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, शिवलिंगावर कोणकोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात...


# शिवलिंगावर अर्पण कराव्यात या 10 गोष्टी 
1. जल, 2. दूध, 3. दही, 4. मध, 5. शुद्ध तूप, 6. साखर, 7. अत्तर, 8. चंदन, 9. केशर, 10. भांग.

या सर्व गोष्टी तुम्ही एकत्र करून किंवा वेगवेगळ्या शिवलिंगावर अर्पण करू शकता.


# शिव पूजेचा सोपा विधी 
> शिव पूजेसाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर घरातच किंवा एखाद्या शिव मंदिरात जावे.
> मंदिरात गेल्यानंतर  महादेव तसेच देवी पार्वती आणि नंदीला गंगाजल किंवा शुद्ध जल अर्पण करावे.
> जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर चंदन, तांदूळ, बिल्वपत्र, रुईचे फुल आणि धोत्रा अर्पण करावा.
> पूजा झाल्यानंतर अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. ऊँ सांब सदा शिवाय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


# या गोष्टीही लक्षात ठेवा
> तुम्ही महादेवाची पूजा करत असाल तर अधार्मिक कार्यापासून दूर राहावे.
> कधीही आपल्या आई-वडिलांचा आणि वडीलधारी मंडळींचा अपमान करू नये. 
> स्वतःचे काम प्रामाणिकपणे करावे. यामुळे यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते.

बातम्या आणखी आहेत...