Home | Business | Auto | How Uber Is Letting You Earn From 'UberDost' app

घरी जर फ्री राहत असाल....तर उबरला मित्र बनवून स्मार्टफोनद्वारे करा हे काम; दर महिन्याला होऊ शकते 25 हजार रूपयापर्यंत कमाई

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 25, 2019, 12:15 PM IST

यासाठी आपल्या खिशातून एक रूपयाही खर्च करण्याची आवश्यकता नाही

 • How Uber Is Letting You Earn From 'UberDost' app


  ऑटो डेस्क - टॅक्सी कॅब सर्व्हिस उबर तुम्हाला घर बसल्या पैसे कमविण्याची संधी देत आहे. एक व्यक्ती 20 ते 25 हजार रूपये कमाई करू शकत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. यासाठी एक रूपयाची देखील गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. हे सर्व काम युझरच्या स्मार्टफोनद्वारे होईल. फोनच्या वापराने दर महिन्याला 25 हजार रूपयांची कमाई करू शकता येते. यासाठी तुम्हाला उबर (Uber)च्या एका अॅपचा वापर करावा लागेल.

  उबरशी मैत्री करून करा कमाई

  घर बसल्या पैसे कमवण्यासाठी तुम्हाला आपल्या फोनमध्ये UberDOST अॅप इन्स्टॉल करावे लागेल. गूगल प्ले स्टोअरवरून हे अॅप विनामुल्य इन्स्टॉल करता येते. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कमाई करण्यास सुरूवात करू शकतात.


  > UberDOST अॅपला ओपन करा आणि तेथे नोंदणी करा.

  > रजिस्ट्रेशनसोबत लॉगिन करा. यानंतर तुम्ही उबरचे पार्टनर होताल.

  > आता तुमच्याकडे एक युनिक रेफरल लिंक येईल. या लिंकला तुमच्या मित्रांना पाठवा.

  > या लिंकच्या मदतीने कॅब बुक झाल्यानंतर त्यावर तुमची कमाई देखील होईल.

  > 20 दिवसांच्या आत 10 ट्रिप पूर्ण झाल्यानंतर 150 रूपये मिळतात.

  > यासोबतच कंपनी तुम्हाला पुढली 3 राइडसाठी 50 ते 75 रूपयांचा डिस्काउंट देखील देते.


  UberDOST अॅपविषयी थोडक्यात

  > या अॅपला आतापर्यंत 5 लाखहून अधिकवेला इन्स्टॉल करण्यात आले आहे.

  > युझर्सनी या अॅपला गूगल प्ले स्टोअरववर 5 पैकी 4.5 स्टार रेटिंग दिली आहे.

  > हे अॅप प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगली जागा व्यापते.

Trending