आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.35 लाखमध्ये Maruti Ritz तर 2.10 लाखमध्ये खरेदी करू शकता बस, बँक करत आहे लिलाव; अशाप्रकारे करा अप्लाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : अनेक जण वाहन खरेदी करण्यासाठी बँकेकडून वाहन कर्ज घेत असतात. बऱ्याचवेळा लोक बँकेचे कर्ज फेडण्यास असक्षम ठरतात. अशावेळी कर्ज न फेडल्यामुळे बँक त्या गाड्या ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करतात. अशाचप्रकारचा लिलाव पार पडत आहे.  तुम्ही सुद्धा या लिलावात भाग घेऊन आपल्या पसंतीची कार खरेदी करू शकतात. याठिकाणी अनेक गाड्यांचा कमी किमतीत लिलाव होत आहे. आम्ही आपणास अशाच काही गाड्यांविषयी आणि या लिलावात सहभाग कसा घेता येईल याबाबत सांगत आहोत. 

 
Maruti Ritz फक्त 1.35 लाख रूपयात

कॉरपोरेशन बँक महिपालपूर, दिल्ली शाखेच्या वतीने Maruti Ritz कारचा लिलाव होत आहे. दिल्लीचा नंबर असलेली या गाडीचे मॉडल 2016 चे आहे. याची रिझर्व्ह किंमत 1.30 लाख रूपये आहे. आपण जर या कारसाठी बोली लावण्यास इच्छुक असाल तर आपल्याला 5 हजार अधिक म्हणजेच 1.35 लाख रूपयांपासून बोलीला सुरुवात करावी लागेल. या कारचा लिलाव 22 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11.45 पासून ते दुपारी 1.15 वाजेपर्यंत होणार आहे. यासाठी तुम्हाला 21 जानेवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अप्लाय करावे लागणार आहे. हीच बँक आणखी एका Maruti Ritz चा लिलाव करणार आहे. याची रिझर्व्ह किंमत 2.10 लाख रूपये असून यासाठी 2.15 लाखापासून बोली लावावी लागणार आहे.  

 

2.60 लाख रूपयांत व्यवसायिक वाहन 

आपल्याला व्यवसायिक वाहन खरेदी करायचे असेल तर कॉरपोरेशन बँकद्वारे  SML isuzu चे sartaj CNGE truck चा लिलाव होत आहे. याची रिझर्व्ह किंमत 2.60 लाख रूपये आहे. यासाठी तुम्हाला 5 हजार रूपये वाढवून बोलीला सुरुवात करावी लागणार आहे. 22 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11.45 ते दुपारी 1.15 वाजेपर्यंत या वाहनाचा लिलाव होणार आहे. यासाठी तुम्हाला 21 जानेवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अप्लाय करावे लागणार आहे. 
 
इतक्या किमतीत मिळेल टाट सुमो
कॉरपोरेशन बँकेद्वारे टाटा सुमोचा सुद्धा लिलाव होत आहे. 2013 सालचे हे मॉडल आहे. याची रिझर्व्ह किंमत 1.95 लाख रूपये असून 5 हजार रूपये शिल्लकने बोलीची सुरूवात करावी लागणार आहे. लिलवाची तारीख 22 जानेवारी 2019 असून सकाळी 11.45 ते दुपारी 1.15 पर्यंत बोली लावण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला 21 जानेवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. 
 
बसचा सुद्धा होणार लिलाव
कॉरपोरेशन बँकेच्या कोडूनगलूर शाखेद्वारा एक अशोक लेलँड पीसीवी बसचा लिलाव होत आहे. केरळ नंबर असणाऱ्या या बसची रिझर्व्ह किंमत 2 लाख रूपये आहे. यासाठी तुम्हाला 50 हजार रूपये अर्नेस्ट मनीच्या स्वरूपात जमा करावे लागणार आहेत. या बसची बोली 2 लाख 10 हजारांपासून सुरू होणार आहे. बसचे मॉडल 2013 चे आहे. या बसच्या लिलावात सहभागी होण्यासाठी 27 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अप्लाय करावे लागणार आहे. 28 डिसेंबर रोजी 11.45 ते 1.15 दरम्यान होणाऱ्या बोलीमध्ये सहभाग घेऊ शकता. 

 
फक्त 1 लाख 5 हजारांत मिळणार टाटा नॅनो 
चेन्नई येथील अक्षय इमेजिंग सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड द्वारे टाटा नॅनोचा लिलाव होत आहे. 2014 च्या या मॉडलची कारची रिझर्व्ह किंमत 1 लाख रूपये असून 5 हजार रूपये अधिकने बोली लावावी लागणार आहे. या कारचा लिलाव 28 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 3 ते 4 दरम्यान होणार आहे. यासाठी तुम्हाला 27 डिसेंबर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. 

 

अशाप्रकारे करा अप्लाय

या लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्हाला bankauctions.in या संकेतस्थळावर व्हेईकल कॅटेगिरी मध्ये सर्च करून अप्लाय करावे लागणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...