आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात नोकरी करायची असेल तर या सरकारी पोर्टलवर करा रजिस्ट्रेशन; या पोर्टलवर आहेत 1.6 लाख विदेशी इम्प्लीयर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : आपल्याला जर विदेशात नोकरी करायची इच्छा असेल ही बातमी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. आता तुम्हाला विदेशात नोकरी प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे फिरण्याऐवजी परराष्ट्र मंत्रालययाच्या ई-मायग्रेट या पोर्टलवर तुमची माहिती अपलोड करू शकता. येथे माहिती अपलोड केल्यानंतर विदेशातील नोकरीसाठी तुम्हाला कोणत्या एजंटची गरज पडणार नाही आणि कोणाकडून तुमची फसवणूक देखील होणार नाही. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानुसार ई-मायग्रेट पोर्टल हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. याठिकाणी ईसीआर देशांतील कामगारांच्या भर्तीमध्ये सहभागी असलेल्या सर्व भागधारकांना एकत्र आणतो. पोर्टलची सुरुवात केल्यापासून आतापर्यंत 20 लाखांहून अधिक प्रवासी मंजुरी (ईसी) जारी करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या पोर्टलवर जवळपास 1300 भर्ती एजंट आणि 1 लाख 60 हजार परदेशी नियोक्त्यांची नोंदणी केलेली आहे. ईसीआर श्रेणीतील कामगारांच्या पासपोर्ट तपशीलांची पडताळणी करण्यासाठी, हे पोर्टल पासपोर्ट सेवा प्रकल्पाशी (पीएसपी) जोडले गेले आहे. तसेच ही प्रणाली इम्रिगेशन ब्यूरोशी देखील जोडली गेलेली आहे. 
 
विदेशात जाण्याआधी मिळणार प्रशिक्षण
परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांना सरकारकडून प्रशिक्षण देण्यात येते. यावर्षीच्या सुरुवातीला नोकरीसाठी खाडी क्षेत्रात जाणाऱ्या कामगारांसाठी वन-डे प्री-डिपार्टमेंट ऑररेन्टी ट्रेनिंगची (पीडीओटी) सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 30 हजार पेक्षा जास्त कामगारांना एक-दिवसीय पीडीओटी प्रदार करण्यात आले आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रत्येकी दोन आणि कोचीनमध्ये एक प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. 

 

महिलाचे वय किमान 30 वर्ष असायला हवे

परराष्ट्र मंत्रालयाच्या सध्याच्या दिशानिर्देशानुसार, ईसीआर देशांत नोकरीसाठी जाणाऱ्या महिला कामगारांचे किमान वय 30 वर्ष आहे. स्थलांतरित व्यवसायात त्यांचे प्रवासी केवळ सात मान्यताप्राप्त भर्ती एजन्सीद्वारे किंवा ई-प्रवासी प्रणालीवर नोंदणीकृत परदेशी नियोक्ताद्वारेच कामगार भरती करण्यासाठी परवानगी आहे. विदेशी नियोक्ताद्वारे थेट भरती करण्याबाबत प्रवासी संरक्षण कार्यालयाद्वारे स्थलांतर स्वीकृति देण्यापू्र्वी गंतव्य देशात स्थित भारतीय मिशनद्वारे काम कराराचे सत्यतापत्र आणि 2500 अमेरिकी डॉलर्सची बँक गॅरंटी जमा करणे अनिवार्य आहे.

 

पीबीएसकेकडून घेऊन शकता मदत 
नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय सहायता केंद्र (पीबीएसके) येथून प्रवासी कामगार मदत घेऊ शकता आणि आपली तक्रार देखील दाखल करू शकता. हे केंद्र 24X7 भारतातील विविध भाषांमध्ये मदत करते. याशिवाय कोचिन, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई आणि लखनऊ इत्यादी ठिकाणी  क्षेत्रीय प्रवासी सहायता केंद्र आहेत. तर दुबई, रियाद, जेद्दा, शारजाह आणि क्वाललांपूर येथे पीबीएसके केंद्र कार्यरत आहेत. दूतावासांमध्ये टोल-फ्री हेल्पलाइन देखील उपलब्ध आहे, जे नियमितपणे ओपन हाऊसचे आयोजन करते. यासाठी शेल्टर होमची देखील स्थापना करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...