अमेरिकन मीडिया / हाउडी मोदी म्हणजे निव्वळ तमाशा! याचा ट्रम्प यांना निवडणुकीत काहीच फायदा होणार नाही

एकाच विचारसरणीचे नेते व्यासपीठावर एकत्रित; पण, फायदा होणार नाही -यूएस मीडिया

दिव्य मराठी वेब

Sep 23,2019 01:44:51 PM IST

ह्यूस्टन - अमेरिकेतील ह्यूस्टन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसून आले. दोन्ही नेत्यांनी ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडिअममध्ये 50 हजारांहून अधिक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना संबोधित केले. दोन्ही नेत्यांच्या या कार्यक्रमाचे भारतीय मीडियामध्ये तोंडभर कौतुक केले जात आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील माध्यमांच्या यावर नजरा होत्या. परंतु, अमेरिकन मीडियाने त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.


हा इव्हेंट म्हणजे ट्रम्प यांचा तमाशा!
अमेरिकन दैनिक 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने या इव्हेंटला ट्रम्प यांचा तमाशा म्हटले आहे. त्यांनी लिहिल्याप्रमाणे, ज्या प्रमाणे ट्रम्प यांनी 2016 मध्ये लोकांचे समर्थन मिळवले होते, त्याचप्रमाणे 2020 मध्ये ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प भारतीय अमेरिकन नागरिकांशी कनेक्ट होण्याचे महत्व समजत आहेत. 21 व्या शतकात दोन्ही देशांच्या विकासासाठी याचा फायदा होईल. द वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या संपादकीयमध्ये लिहिले, "दोन्ही नेत्यांनी एकत्रित उपस्थिती लावून भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या संबंधांचे दर्शन घडवले. जगातील दोन सर्वात मोठे लोकशाही देश आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात वरचढ ठरू पाहणाऱ्या चीनवर नियंत्रण ठेवू शकतात. ट्रम्प यांना हे उमगले. तर बराक ओबामा यांनी यासाठी चांगले काम केले होते."


पुन्हा ट्रम्प येणे कठीण -न्यूयॉर्क टाइम्स
न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले, या रॅलीमध्ये एकाच विचारसरणीच्या दोन नेत्यांना एका व्यासपीठावर आणले आहे. दोन्ही कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी लोकांना आवडणारी आश्वासने देऊन सत्ता मिळवली होती. दोघांनी आप-आपल्या देशाला महान बनवण्यासाठी, धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक सुधारणांची भाषणे दिली होती. यासोबतच, दैनिकाने या कार्यक्रमात मोदींनी भारतीय-अमेरिकन नागरिकांना 'अबकी बार ट्रम्प सरकार' असे आवाहन केले. पण, प्रत्यक्षात ट्रम्प यांना मते मिळवणे सोपे राहणार नाही.

X
COMMENT