आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भुसावळ- हावडा- मुंबई (अप) गीतांजली एक्स्प्रेसच्या (12860) एस-3 या बोगीचा एक्सल गरम झाला होता. सीएनडब्ल्यू विभागातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर गाडी भुसावळ स्थानकावर येताच डबा बदलण्यात आला. गुरुवारी दुपारी 4.30 वाजेच्या या प्रकारात गाडी दाेन तास स्थानकावर खोळंबली होती. मात्र, डबा बदलला नसता तर अपघात होण्याची शक्यता होती. सुदैवाने हा प्रकार टळला.
हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्म एकवर आली. यावेळी एस-3 बोगीचा एक्सल गरम झाल्याचे रेल्वे कर्मचारी गजेंद्र सनस, मनोज चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब तत्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर रेल्वेच्या इंजिनीअरिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानकावर गाठून बोगीची पाहणी केली. यानंतर तत्काळ डबा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. एक्सल गरम झालेला डबा गाडीपासून वेगळा करत तेथे पर्यायी बोगी जोडण्यात आली.
या सर्व प्रकारात मुळातच 3.30 तास विलंबाने चालणारी गीताजंली एक्स्प्रेस भुसावळ जंक्शनवर तब्बल दोन तास थांबून होती. पर्यायी बोगी बसवल्यावर गुरुवारी सायंकाळी 6.20 वाजता ही गाडी मुंबईकडे रवाना झाली. यावेळी स्टेशन डायरेक्टर जी.अार. अय्यर आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.