आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होणार..पहिली-दुसरीच्या मुलांना दीड किलोपेक्षा जास्त नको, होमवर्कही नको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली | इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांची लवकरच गृहपाठातून सुटका हाेणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखून त्याच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. यासोबतच दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे कमाल वजनही ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार, पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचे दप्तर दीड किलोपेक्षा जड नसावे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा पाच किलोपर्यंत आहे. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखून आपल्या राज्यांत तत्काळ लागू करावीत, असे मंत्रालयाने राज्यांना सांगितले आहे. 

 

पहिली-दुसरीच्या वर्गालाच फक्त गणित व भाषा विषय 
 - इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एनसीईआरटीच्या शिफारशीनुसार गणित, भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवण्याचेच निर्देश आहेत. 
 - शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढू नये यासाठी त्यांना अतिरिक्त पुस्तके आणि शालेय साहित्य आणण्याचेही निर्देश आता देता येणार नाहीत. 
-  इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना फक्त गणित व भाषा विषय शिकवण्याची परवानगी मंत्रालयाने दिली आहे. 
 
१०वीपर्यंत ५ किलोपेक्षा जास्त वजनी दप्तर नाही 
इयत्ता दप्तराचे ओझे 

१ ते २ १.५ किलो 
३ ते ५ २-३ किलो 
६ ते ७ ४ किलो 
८ ते ९ ४.५ किलो 
१० वी ५ किलो 

 

महाराष्ट्रात बारगळली दप्तरमुक्तीची योजना 
मुंबई |काेर्टाच्या अादेशानंतर महाराष्ट्र सरकारने १ डिसेंबर २०१५ पासून दप्तरांचे अाेझे कमी करण्याचे अादेश दिले. पहिलीसाठी २.२१० किलो, तर आठवीसाठी ४.२४५ किलो दप्तराची मर्यादा घातली गेली. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये समितीकडून तपासणीही झाली. विद्यार्थ्यांकडे मर्यादेपेक्षा जास्त दप्तराचे अाेझे अाढळलेल्या शाळांवर कारवाईचाही निर्णय झाला. प्रत्यक्षात कुठेच कारवाई झाली नाही. काही महिन्यांतच या अादेशाला हरताळ फासला गेला आणि आदेशच बारगळला. 

बातम्या आणखी आहेत...