Home | Sports | From The Field | Hridik's 50 off 17 balls, third fastest half century,

हार्दिकच्या १७ चेंडूंत ५० धावा; तिसरे वेगवान अर्धशतक, मुंबई संघाचा ३४ धावांनी पराभव

वृत्तसंस्था | Update - Apr 29, 2019, 10:29 AM IST

यापूर्वी पोलार्ड आणि किशनने केला होता वेगवान अर्धशतकाचा विक्रम

  • Hridik's 50 off 17 balls, third fastest half century,

    काेलकाता - हार्दिक पांड्याच्या (३४ चेंडूंत ९१) झंझावातानंतरही मुंबई इंडियन्स संघाला रविवारी आयपीएलमधील पाचवा पराभव टाळता आला नाही. यजमान काेलकाता नाइट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सवर ३४ धावांनी मात केली. यासह काेलकाता संघाने पराभवाची मालिका खंडित केली.
    प्रथम फलंदाजी करताना काेलकाता संघाने २ बाद २३२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईने सात गड्यांच्या माेबदल्यात १९८ धावांपर्यंत मजल मारली.

    हार्दिक चमकला :
    मुंबईचा हार्दिक तुफानी खेळीने चमकला. त्याने १७ चेंडूंत ५० धावा काढल्या. यासह त्याने आयपीएलमधील तिसरे वेगवान अर्धशतक ठाेकले. यापूर्वी पाेलार्ड (२०१६) व किशन (२०१८) यांनी असा पराक्रम गाजवला आहे. त्यानंतर आता हार्दिकने ही तुफानी खेळी केली.

Trending