आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Expressed His Desire To Play The Role Of Police Officer, Saying It Would Be A Big Challenge To Play A Police Officer's Role

ऋतिकने व्यक्त केली पोलिसाची भूमिका साकारण्याची इच्छा, म्हणाला - पोलिस अधिकारी साकारणे मोठे आव्हान असेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मुंबई पोलिस कल्याण निधीच्या उमंग या कार्यक्रमात बॉलीवूडच्या अनेक ताऱ्यांनी हजेरी लावली. या वेळी अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात हृतिक रोशननेही दमदार परफॉर्मन्स दिला. यावेळी तो म्हणाला..., मी माझ्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. पण मला पोलीसाची भूमिका करण्याची संधी काही मिळाली नाही. मी निर्मात्यांना माझ्यासाठी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका लिहिण्याची गळ घालणार आहे, कारण ती माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका असेल. ती माझ्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट भूमिका व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन. पुढे तो म्हणाला..., मी गेल्यावर्षी उमंग 2019 मध्ये येऊ शकलो नव्हतो, पण यावेळी ते चुकवायचे नाहीच असे ठरवले होते. येथे या मंचावर सर्व पोलिसांसाठी सादरीकरण करताना मला खूप आनंद होत आहे. कारण हेच पोलिस रात्रंदिवस आपल्यासाठी काम करतात आणि आपल्याला सुरक्षित ठेवतात.

बातम्या आणखी आहेत...