आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Is Teaching Life Lesson Of Anand Kumar, First Lesson 'How To Achieve Moving Target'

ऋतिक शिकवत आहे आनंद कुमारचे लाइफ लेसन, पहिली शिकवण - 'मूव्हिंग टार्गेट कसे अचिव्ह करावे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बिहारचे गणित तज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट 'सुपर-30' 12 जुलैला रिलीज होणार आहे. याच्यापूर्वीच ऋतिक आपल्या टीमसोबत चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त झाला आहे. यासोबतच तो सोशल मीडियावर यूनीक प्रमोशन करत आहे. ऋतिकने याला 'लाइफ लेसन्स फ्रॉम आनंद' असे नाव दिले आहे. 

 

मूव्हिंग टार्गेटवर हिट करणे आहे पहिले लेसन... 
ऋतिकने इंस्टाग्रामवर चित्रपटातील एक सीन शेअर केला आहे. ज्यामध्ये बोर्डावर एक ट्रँगल बनवला आहे. या ट्रँगलच्या एका कोपऱ्यावर उंदीर आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यावर घार होती. फोटोच्या कॅप्शनमध्ये ऋतिकने लिहिले...   

 

घार उंदराला कशी पकडते, ती Point A वर आक्रमण करत नाही जिथे उंदीर असतो, ती आपला निशाणा बदलते आणि Point B वर साधते, जिथे उंदीर नाहीये, पण असणार आहे. आनंद कुमारचे लाइफ लेसन्स, हे सर्व एक ध्येय पूर्ण करण्यासाठी आहे. कारण आयुष्य खूप अनिश्चित आहे. 

 

 

वादांमध्ये अडकला आहे चित्रपट... 
आयआयटी विद्यार्थ्यांनी आनंदवर आरोप केला होता की, ते आपल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेविषयी खोटे दवे करतात. त्यांनी हीदेखील मागणी केली होती की, त्यांनी 2016 मध्ये आयआयटी जेईई करणाऱ्या विद्यार्थ्यांची लिस्ट दाखवावी. गोवाहाटी उच्च न्यायालयाने मागच्यावर्षी आनंदला एक नोटिस जारी केली होती. ज्यामध्ये त्यांना विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उत्तर द्यायला सांगितले होते. माहितीनुसर गणित तज्ञने जनहित याचिकेला उत्तर दिलेले नाही. 

 

याआधीही बनले आहेत चित्रपट... 
ही अशी पहिलीच वेळ आंही जेव्हा आनंदची कहाणी ऑनस्क्रीन दिसणार आहे. डिस्कवरी चॅनलने आनंद आणि त्यांच्या 'सुपर-30' बॅचवर एका तासाची डॉक्यूमेंट्री बनवली होती. एसटीबी रिसर्च इंस्टीट्यूट, जापानचे मुख्य अर्थशास्त्री योइची इटोहनेदेखील जापानचे एनएचके चॅनेलसाठी 'सुपर 30' वर एक चित्रपट बनवला आणि आनंदने घेतलेल्या पुढाकाराला "सीक्रेट व्हेपन ऑफ इंडिया" म्हणले होते.