• Home
  • Bollywood
  • Gossip
  • Hrithik put a condition in front of the director and producers, said 'The movie will only do if it has Tiger Shroff'

Bollywood / दिग्दर्शक, निर्मात्यांसमोर ऋतिकने ठेवली होती एक अट, म्हणाला - 'चित्रपट तरच करेन जर त्यामध्ये टायगर श्रॉफ असेल' 

ऋतिक म्हणाला, 'टायगरची बरोबरी कुणी करू शकत नाही.'

Sep 11,2019 12:36:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशनचा आगामी चित्रपट 'वॉर' 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात पहिल्यांदा त्याच्यासोबत टायगर श्रॉफदेखील दिसणार आहे. एका मुलाखतीत ऋतिकने टायगरसोबतच्या आपल्या बॉन्डिंगबद्दल सांगितले. त्यांच्यानुसार, हा चित्रपट टायगरशिवाय कारण्यास त्याने नकार दिला होता. ऋतिक म्हणाला, "मी खूप खुश आहे. एकेकाळी तो माळ पाहून प्रेरित व्हायचा आणि आता मी त्याला पाहून प्रेरित होतो. म्हणजे एक सर्कल पूर्ण झाले."

'सुपर 30' च्या नंतर झाला आळशी...
ऋतिकने पुढे सांगितले, 'सुपर 30' नंतर मी आळशी झालो होतो. मी फक्त जेवण करत होतो वर्कआउट थांबले होते आणि खूप खुश होतो. मग मी विचार केला की, परत कसे येऊ. मला अशी स्क्रिप्ट हवी होती, जी मला माझ्या आधीच्या चित्रपटासारखे एम्पावर करू शकेल. त्यामुळे मी माझे बेस्ट दिले. मला त्रास होत होता, माझ्या जॉइंट्समध्ये लागले होते. स्टिफनेसदेखील होती. फायनली मला एक स्क्रिप्ट मिळाली आणि मी सिड (डायरेक्टर सिद्धार्थ आनंद) आणि आदि (प्रोड्यूसर आदित्य चोप्रा) ला म्हणालो. मी त्यांना म्हणालो की, मी 'वॉर' तेव्हाच करेन जर त्यामध्ये टायगर श्रॉफदेखील असेल."

'टायगरची बरोबरी कुणी करू शकत नाही.'
ऋतिक म्हणाला, "मला माहित आहे की, टायगरच के असा अभिनेता आहे, जो माझ्यासमोर उभा राहू शकतो. मला माझे बेस्ट द्यावे लागेल त्याची बरोबरी करण्यासाठी. मला नाही वाटत की, मी तेव्हा त्याच्या बरोबरीने होतो. ही चांगली गोष्टीदेखील आहे. दोन्हीकडून आम्ही दोघे एकमेकांना उत्तम बनण्यासाठी प्रेरित करू. तो अद्भुत आहे. तो इथे 50 वर्षे राहणार आहे आणि कुणीही त्याची बरोबरी करू शकत नाही."

7 देशांमध्ये शूट झाला 'वॉर'...
'वॉर' चे शूटिंग 7 देश आणि 15 शहरांमध्ये झाले. जगभरातील चार सर्वात उत्तम अॅक्शन डायरेक्टर्सने यातील सीन कोरियोग्राफ केले आहेत, जेणेकरून वेगळ्या प्रकारचे अॅक्शन पाहायला मिळावे. चित्रपटात ऋतिक आणि टायगरसोबत वाणी कपूर, आशुतोष राणा, दीपानिता शर्मा आणि अनुप्रिया गोयंकादेखील आहेत.

X