आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Roshan 45th Birthday: Hrithik Maintain Exercise With Tough Workout Routine And Daily Diet Plan

हृतिक रोशन आठवड्यातून 4 दिवस करतो एक्सरसाइज आणि 3 दिवस करतो आराम, फक्त 2 चमचे तेलात बनलेले पदार्थ खातो, दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिऊन राहतो फिट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. हृतिक रोशन 10 जानेवारीला 45 वर्षांचा झाला आहे. हृतिक सध्या आनंद कुमारवर तयार होत असलेल्या सुपर 30 बायोपिकमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी हृतिकने ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. यासाठी त्याने आपले वजन कमी केले आहे. पण या चित्रपटासाठी त्याने किती वजन कमी केले हे अजून समोर आलेले नाही. असेही हृतिक नेहमी आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. यापुर्वी त्याने क्रिश चित्रपटासाठी 10 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आहे. यासाठी त्याने हार्ड वर्कआउट आणि डायट प्लान फॉलो केला होता. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला हृतिक रोशनच्या फिटनेस आणि डायट प्लानविषयी सांगणार आहोत. 

 

#वर्कआउट प्लान 
- हृतिक दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पितो. दिवसभरात फक्त 2 चमचे तेल खातो. त्याचा वर्कआउटही टफ असतो. 
- हृतिक फिटनेसचा इंटरनॅशनल ट्रेंड आणि वर्कआउट रुटीन फॉलो करतो. यामध्ये तो कार्डियो, स्ट्रेचिंग, पावर वर्कआउट करतो.
- रोज 20-30 मिनिटांची कार्डियो एक्सरसाइज करतो. तो आठवड्यातून 4 दिवस एक्सरसाइज करतो आणि तीन दिवस रेस्ट करतो. 

 

# Monday
सोमवारी तो चेस्ट आणि बॅक एक्सरसाइज करतो. यामध्ये डम्बल, स्टेंडिंग काफ रेज, हेंड केबल पुल, बेंच प्रेस सारख्या एक्सरसाइजचा समावेश असतो. 

# Tuesday
आठवड्याच्या दूस-या दिवशी तो लेग एक्सरसाइज करतो. यामध्ये लेग प्रेस, स्कॉट, लाइंग की कर्ल या एक्सरसाइज करतो.

# Wednesday 
रेस्ट

# Thursday 
या दिवशी तो शॉल्डर आणि एब्स लावतो. यामध्ये स्विमिंग प्लँक, वॉकआउट, वेट सिट-अप्स या एक्सरसाइजचा समावेश असतो.

# Friday
फ्रायडेला तो आर्म एक्सरसाइज करतो. यामध्ये बायसेप्स, ट्रायसेप्ससोबतच पावर एक्सरसाइज सारख्या क्लॉज ग्रिप बारबैल बेंच प्रेस, ट्राइसेप्स पुशडाउन, डम्बलच्या वेगवेगळ्या एक्सरसाइजचा समावेश आहे. 

# Saturday- Sunday
रेस्ट

# नॉर्मल डायट प्लान 
मीडिया रिपोर्ट्सनुसार असा असतो त्याचा नॉर्मल डायट प्लान 
ब्रेकफास्ट- दोन कोकोनट पेनकेक, 1 कप दही, 1 कप मिक्स बैरीज
लंच- टर्की, 2 अंडी, अर्धा कप पालक, फिश, 1 ते 2 लीटर पानी
स्नॅक- फ्रूट्स, ओटमील, व्हेजिटेबल
डिनर- ग्रीन बीन्स, कॉर्न, ब्राउन राइस, सलाद

 

एकेकाळी हृतिक आपल्या ट्रेनरला देत होता 20 लाख रुपये महिना
- फिटनेस ट्रेनर क्रिस गेथिन गेल्या दोन दशकांपासून लोकांचे आयुष्य बदलत आहे. क्रिस गेथिन यांचे बॉडी बिल्डिंग डॉटकॉम गाइड टू योर बेस्ट बॉडी हे पुस्तक बेस्टसेलिंग पुस्तक ठरले आहे. या पुस्तकात 12 आठवड्यांची एक्सरसाइज आणि डायट चार्ट फॉलो करायचा असतो. हृतिकनेही त्यांचे हे पुस्तक वाचल्यानंतर क्रिश-3 साठी त्यांना कॉल केला होता. 
- क्रिस गेथिनने हृतिकच्या बॉडीला शेपमध्ये आणण्यासाठी 12 आठवड्यांचे टार्गेट ठेवले होते. हे टार्गेट हृतिकने 10 आठवड्यात पुर्ण केले होते. क्रिश-3 मध्ये जबरदस्त बॉडी बनवण्यासाठी हृतिकने आपल्या ट्रेनरला प्रत्येक महिन्याची 20 लाख फीस दिली होती. 
- क्रिस गेथिनने एका मुलाखतीत सांगितले होते की, हृतिक स्वतःला शेपमध्ये ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठतो आणि दिवसातून दोन वेळा वर्कआउट करतो. क्रिसने त्यांच्या वर्कआउट रुटीनमध्ये क्रंचेज, स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्क्वॉट्स, लेग कर्ल्स, लेग प्रेस, रिवर्स फ्लाय आणि डंबबेल पुल ओव्हरचा समावेश केला होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...