आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वॉर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट 'वॉर' चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ऋतिक आणि टायगर पहिल्यांदा  एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलरपाहून तुम्हाला कळू शकते की, या चित्रपटात भरपूर अॅक्शन सीन्स असणार आहेत. वाणी कपूर ही चित्रपटातील नायिका आहे.
 

असा आहे चित्रपटाचा ट्रेलर... 
'वॉर' चित्रपटात ऋतिक रोशनच्या भूमिकेचे नाव कबीर आहे. या ट्रेलरमध्ये मध्ये ऋतिक एका विमानावरून दुसऱ्या विमानावर उडी मारताना दिसत आहे. चित्रपटात ऋतिक कोणत्यातरी सीक्रेट एजंटच्या रोलमध्ये दिसणार आहे, जो बंड करणारा आहे. कबीरच्या या बंड करणाऱ्या स्वभावाशी निपटण्यासाठी भारत सरकार खालिद म्हणजेच टायगर श्रॉफला निवडते. कबीरच खालिदचा गुरु असतो.