आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Roshan At Patna Home Town Of Super 30 Founder Anad Kumar On Guru Poornima

ऋतिक रोशन गुरु पोर्णिमेनिमित्त आनंद कुमारच्या पाटणा नगरीत जाणार, राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्यांना करणार अभिवादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - ऋतिक रोशन मंगळवारी गुरु पोर्णिमच्या निमित्ताने पाटण्यात राहणार आहे. येथेच सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार यांचे घर आहे. ऋतिकने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुपर 30 चित्रपटात आनंद कुमार याची भूमिका केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. यामध्ये ऋतिकच्या अभिनयाचे कौतुक देखील करण्यात आले. ऋतिक गुरु पोर्णिमेनिमित्त पाटण्याचा दौरा करत राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणाऱ्यांना अभिवादन करणार आहे. 

 

सुपर 30 ने पहिल्या आठवड्यात 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.83 कोटी रुपये जमा केले होते. शनिवारी कमाईत 53% वाढ होऊन कलेक्शन 18.19 कोटी रूपये राहिले. तर रविवारी 20.74 कोटी रुपयांची कमाई केली. 

 

फिल्म मेकर्सचे म्हणणे आहे की, सुपर 30 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरी ठरली आहे. कंटेंट, ऋतिकचा अभिनय आणि एक प्रेरणादायक कथा यामुळे हा चित्रपट एक उत्तम मनोरंजककारी ठरत आहे.  या चित्रपटात ऋतिक रोशनसोबत मृणाल ठाकूरने काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...