आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Roshan Became The Sexiest Asian Man In The World For 2019 And Decade, Shahid In Second And Tiger At Number Four

2019 आणि या दशकातील सर्वात सेक्सी पुरुष ठरला हृतिक रोशन, शाहिद दुस-या तर टायगर चौथ्या क्रमांकावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. हृतिकच्या नावाची नोंद ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019’च्या यादीत झाली आहे. तर शाहिद कपूर या यादीत दुस-या स्थानावर आणि टायगर श्रॉफ चौथ्या स्थानावर आहे. ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला सर्वाधिक मते मिळाली आहेत. इतकेच नाही तर गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक मते मिळवत हृतिकने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019’चा मानही मिळवला आहे.

  • यासाठी सगळ्यांचा आवडता ठरला हृतिक

हृतिकविषयी लिहिताना असजद यांनी सांगितले की, सर्वात सेक्सी पुरुषाच्या कॅटेगरीत सर्वाधिक मतं मिळवणारा तो स्टार ठरला आहे. 2019 मध्ये 'सुपर 30' आणि 'वॉर' या चित्रपटांच्या माध्यमातून हृतिकने त्याचा चार्म कायम ठेवला. ऑल राउंडर टॅलेंटेड स्टार, सकारात्मकतेकडे बघणा-या हृतिकला या दशकातील सर्वात सेक्सी पुरुष म्हणूनही निवडले गेले आहे.

टॉप 10 आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019 ची यादी

दशकातील टॉप 10 आशियातील सर्वात सेक्सी पुरुष
हृतिक रोशन  हृतिक रोशन
शाहिद कपूर    जायन मलिक
विवियन डिसेना    अली जफर
टायगर श्रॉफ   विवियन डिसेना
जायन मलिक    सलमान खान
हर्षद चोप्रा     शाहिद कपूर
बिलाल अशरफ    विराट कोहली
मोहसिन खान   रणबीर कपूर
विराट कोहली    रणवीर सिंह
प्रभास    प्रभास

  • अशी तयार होते लिस्ट

ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनच्या वतीने तयार केली जाणारी ही यादी चाहत्यांकडून मिळणारी मतं, मीडिया अटेंशन या गोष्टींच्या आधारावर बनवली जाते. या मॅगझिनचे संपादक असजद नाजिर यांनीही त्यांच्या ट्विटरवर या दोन्ही यादीतील टॉप 6 नावांची घोषणा केली आहे. 

  • या स्टार्सचाही टॉप 50 मध्ये समावेश

सेक्सिएस्ट एशियन मॅनच्या 16 व्या एडिशनमध्ये या स्टार्ससह पाकिस्तानी अभिनेता बिलाल अशरफ सातव्या स्थानावर आहे. 50 लोकांच्या नावाची यादी 6 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाणार आहे. तर 50 सेक्सिएस्ट वुमनची यादी 13 डिसेंबर रोजी रिव्हिल होणार आहे.