आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशनचा अशातच रिलीज झालेला चित्रपट 'वॉर' ने प्रेक्षकांना इंप्रेस केले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड नोंदले आहेत. हा चित्रपट पहिल्या दिवशी 51.60 कोटींचे कलेक्शन करून आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला. पहिल्या वीकेंडमध्ये याने 150 कोटी रुपये कमवले. 'सुपर 30' नंतर लगेच दुसऱ्याही चित्रपटाला तितकेच यश मिळाल्यामुळे ऋतिक खूप खुश आहे. आपल्या करिअरच्या या फेजबद्दल त्याने दैनिक भास्करसोबत बातचीत केली.
प्रश्न : 'वॉर' च्या सक्सेसबद्दल तू काही बोलू इछितोस ?
उत्तर : मी खूप नशीबवान आहे की, मला अशाप्रकारच्या चित्रपटात काम करायला मिळाले. मी स्वतः अॅक्शन एंटरटेनर्सचा फॅन आहे. मी खूप वाट पाहिली, पण कुणीही चांगली स्क्रिप्ट घेऊन आले नाही. खूप काळानंतर मी हा चित्रपट निवडला तर त्यासाठी सर्वस्व दिले. मला या चित्रपटात माझे इमोशन्स टाकताना खूप मजा आली.
प्रश्न : 'वॉर' ने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, हे तुझ्यासाठी किती महत्वाचे आहे ?
उत्तर : बॉक्स ऑफिस माझ्यासाठी महत्वाचे आहे, कारण हा पब्लिक फीडबॅक जाणून घेण्याचा चांगला मार्ग आहे. पण जर तुम्ही बॉक्स ऑफिसकडेच पाहून चित्रपट साइन करत असाल तर ते चुकीचे आहे. साधारणपणे मी आपल्या कोणत्याही चित्रपटाची पहिली कॉपी पाहिल्यानंतरच बॉक्स ऑफिसबद्दल विचार करतो.
प्रश्न : आता आपल्या एक्शन चित्रपटांची तुलना हॉलिवूडसोबत केली जाऊ शकते का ?
उत्तर : आपले बजेट वाढत आहे आणि मार्केटदेखील, पण जेव्हा अॅक्शनची गोष्ट येते तेव्हा हॉलिवूडशी तुलना करणे चुकीचे आहे. आपला एखादा चित्रपट एवढा चांगला असेल का, ज्याची तुलना आपण 'अॅव्हेंजर' सोबत करू शकू. अजून हॉलिवूडची बरोबरी करायला खूप वेळ लागेल आणि याची दोन करणे आहेत. बजेट आणि स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशन तेव्हा येते, जेव्हा आपण जे करत आहोत, त्यावर गर्व करू. सेटवर क्लॅप बॉय असो किंवा स्पॉट बॉय, आपण त्याचा आदर केला पाहिजे. त्याला अशी जाणीव करून दिली पाहिजे की, तो जे करत आहे ते स्पेशल आहे. तेव्हा कुठे तो चित्रपट विशेष बनेल.
प्रश्न : 'सुपर 30' च्या रिलीजनंतर अनेक लोक म्हणाले की, तुला नॅशनल अवॉर्ड मिळायला हवा, तुझे काय म्हणणे आहे ?
उत्तर : एखादा अॅक्टर आणि त्याची अॅक्टिंगसाठी याच्यापेक्षा उत्तम काय असू शकते. अवॉर्ड आम्हाला प्रोत्साहित करतो. नॅशनल अवॉर्ड बद्दल बोलायचे तर तो तुमच्यामध्ये अभिमान निर्माण करतो. जर नॅशनल अवॉर्ड जिंकलो तर सर्वांचा आभारी असेन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.