आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Roshan Film's New Poster Released 'Super 30', Vikas Bahal Gets Credit For Direction

ऋतिक रोशनचा चित्रपट 'सुपर ३०' चे नवे पोस्टर झाले रिलीज, विकास बहलला मिळाले डायरेक्टरचे क्रेडिट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशनचा चित्रपट 'सुपर 30' चे नवीन पोस्टर रविवारी रिलीज केले गेले. नवीन पोस्टरमध्ये विकास बहलला डायरेक्टर म्हणून क्रेडिट दिले गेले आहे. ऋतिकने हे पोस्टर आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले. सोबतच ट्रेलरच्या रिलीज डेटचाही खुलासा केला. 

 

ऋतिक म्हणला 'हकदार बनो...'
ऋतिकने पोस्टर शेअर करून लिहिले, 'हकदार बनो! 4 जून को सुपर 30 का ट्रेलर आ रहा है।'

 

 

मस्तीसोबतच होईल शिक्षण... 
यामध्ये ऋतिक पावसात भिजलेला दिसत आहे. तसेच पोस्टरच्या खालच्या भागात ऋतिकचे स्टुडंट्सदेखील पावसाची मजा घेण्यासाठी येत आहेत. पोस्टरमध्ये भूमितीचे काही प्रश्नदेखील दिसत आहेत. पोस्टरकडे पाहून वाटत आहे चित्रपटात मुलांच्या शिक्षणाबरोबरच मस्ती करतानाही ते दिसणार आहेत.  

 

12 जुलैला रिलीज होईल चित्रपट... 
चित्रपटात ऋतिकसोबत पंकज त्रिपाठी, म्रूनाल ठाकुर, नंदिश सिंह, अमित साध आणि जॉनी लिवर असे कलाकार मुख्य भूमिकांमध्येब दिसणार आहेत. हा चित्रपट सर्वात आधी 2019 मध्ये रिलीज होणार होता. पण मागच्यावर्षी डायरेक्टर विकास बहलवर मीटूद्वारे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लागला आणि त्याला चित्रपटातून हटवले गेले. त्यामुळे चित्रपटाचे काम काही दिवसांसाठी थांबले होते. त्यांनतर चित्रपटाची तारीख 26 जुलै ठरवली गेली. पण याच दिवशी कंगना रनोटचा चित्रपट 'मेंटल है क्या' रिलीज होता हे. या क्लॅशपासून वाचण्यासाठी 12 जुलैला हा चित्रपट रिलीज केला जाईल. 

बातम्या आणखी आहेत...