आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यावर्षी रिलीज झाली होती डेब्यू फिल्म, त्यावेळी सोबतच मिळाले होते 30 हजार मॅरेज प्रपोजल, पण सगळ्यांचे मन मोडून ऋतिकने चटकन उरकला आपला साखरपुडा आणि लग्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ऋतिक रोशन 45 वर्षांचा झाला आहे. 10 जानेवारी, 1974 ला मुंबईमध्ये जन्मलेल्या ऋतिकने 2000 मध्ये फिल्म 'कहो न प्यार है' ने डेब्यू केला. फिल्ममध्ये ऋतिकला पाहून मुली इतक्या वेड्या झाल्या होत्या की, त्यावेळी त्याला लग्नासाठी तब्बल 30 हजार प्रपोजल मिळाले होते. पण त्याने सर्वांचेच मन मोडून गर्लफ्रेंड सुझॅन खानसोबत 20 डिसेंबर, 2000 ला लग्न केले. दोघांची दोन मुले आहेत. मात्र, आता दोघांचाही घटस्फोट झाला आहे. 

 

6 वर्षांचा असल्यापासूनच करत होता काम...
- डेब्यू फिल्मच्या आधी ऋतिकने अनेक चित्रपटांत चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले. 1980 मध्ये आलेली फिल्म 'आशा' चाइल्ड आर्टिस्ट म्हणून ऋतिकची पहिली फिल्म होती. त्यावेळी त्याचे वय केवळ 6 वर्ष होते. 

- नेहमी कूलमध्ये दिसणारा ऋतिक आपली एक पर्सनल स्क्रॅपबुक मेंटेन करतो. या स्क्रॅपबुकमध्ये तो आपल्या डेली लाइफला फोटोजद्वारे सांभाळून ठेवतो. 

 

घेतला होता बॉलिवूड सोडण्याचा निर्णय... 
चित्रपटांत अक्शन हीरो अशी ओळख असलेला ऋतिक रियल लाइफमध्ये थोडा वेगळा आहे. त्याची डेब्यू फिल्म रिलीज झाल्यानंतर पिता राकेश रोशनवर झालेल्या माफिया अटॅकने ऋतिकला परेशान केले होते. त्याने बॉलिवूड सोडण्याचाही निर्णय घेतला होता. 

- ऋतिक हिशेबाच्या बाबतीत खूप कमकुवत आहे. हे काम त्याचे आई-वडीलच सांभाळतात. सुझॅनला घटस्फोट देण्यापूर्वी तीही या कामात मदत करायची. 

 

लहानपणी होता एक प्रॉब्लम... 
चित्रपटांत जबरदस्त डायलॉग बोलणारा ऋतिक लहानपणी अडखळत बोलायचा. त्याने या समस्येपुढे हार मानली नाही तर त्याने संघर्ष केला आणि तो ठीकही झाला. 

- ऋतिक एक खूप चांगला डान्सर आहे. 21 व्या वर्षापर्यन्त त्याला डान्स करायला त्रास व्हायचा. त्याला पाठीच्या हाडांमध्ये प्रॉब्लम होता आणि डॉक्टरांनी सांगितले होते की, तो कधीच डान्स करू शकणार नाही. पण त्याने उपचारघेतले आणि आज त्याची गणना सर्वोत्तम डान्सर्समध्ये होते. 

बातम्या आणखी आहेत...