आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतिक रोशनने सोडला 'सत्ते पे सत्ता' चा रीमेक, कथेतील बदलांमुळे घेतला बाहेर होण्याचा निर्णय 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशन निर्माता रोहित शेट्टीच्या त्या चित्रपटापासून दूर झाला आहे, जो 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटाचा रीमेक असल्याचे सांगितले जात होते. हे अशावेळी झाले आहे, जेव्हा मेकर्स चित्रपटाच्या लीड स्टारकास्टची घोषणा करण्याचे प्लॅनिंग करता होते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने चित्रपट सोडण्याचा निर्णय याच्या स्क्रिप्टमधील बदलांमुळे घेतला. 


पिंकव्हिलाच्या बातमीनुसार, प्रॉब्लेम तेव्हा सुरु झाला. जेव्हा निर्माता रोहित शेट्टी, अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी स्टारर 'सत्ते पे सत्ता' च्या रिमेकचे राइट्स खरेदी करण्यात अयशस्वी झाला. निर्माता रोमू एन. सिप्पी यांच्या फॅमिली मेम्बर्सने राइट्ससाठी 2-3 कोटी रुपये मागितले होते. जे शेट्टी आणि त्याच्या टीमला खूप जास्त वाटले. नंतर त्याने पुढे बातचीत करण्याऐवजी 1954 मध्ये आलेला हॉलिवूड चित्रपट 'सेव्हवन ब्राइड्स फॉर सेव्हन ब्रदर्स' चे राइट्स खरेदी केले, ज्यावरून 'सत्ते पे सत्ता' ची कथा अडाप्ट केली गेली होती. फराह खानच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या रिमेकचे नाव आता 'सेव्हन' असेल. 


रिपोर्टमध्ये पुढे लिहिले गेले आहे की, इंग्रजी चित्रपटातून घेतलेल्या कथेचा रिमेक करण्यात ऋतिक अजिबात रस नाही. त्यामुळे त्याने फराह खान आणि रोहित शेट्टीला सांगितले आहे की, ते इतर कोणत्याही अभिनेत्याला त्यांच्या प्रोजेक्टसाठी कास्ट करू शकतात. दोघांनी नव्या कलाकाराचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा अजूनही प्रोजेक्टचा भाग आहे.  

बातम्या आणखी आहेत...