आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेब्यू फिल्मसाठी आपला एक बोट कापणार होता हृतिक रोशन, वडील टाकत होते प्रेशर तर आईने दिला होता नकार, त्याच चित्रपटाने जिंकले होते 92 अवॉर्ड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 10 जानेवारीला हृतिक रोशनने वयाची 45 वर्षे पुर्ण केली. हृतिकने 'कहो न प्यार है'(2000) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हृतिकच्या हातात 10 नाही तर 11 बोट आहेत. हृतिक नेहमीच आपले एक्स्ट्रा फिंगर लपवण्याचा प्रयत्न करतो. हृतिकचे वडील राकेश रोशन त्याला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्याचा एक्स्ट्रा बोट एक समस्या बनली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डान्स, हँडशेक अशा अनेक सीन्समध्ये त्याचा बोट स्पष्ट दिसत होता. तेव्हा चित्रपटाचे डायरेक्टर असलेल्या राकेश रोशनला वाटले की, त्याचा एक्स्ट्राचा बोट कापून टाकायला हवा. 


आईमुळे केले नाही ऑपरेशन 
- डेब्यू चित्रपटादरम्यान हृतिक आपल्या बोटाचे ऑपरेशन करण्यासाठीही तयार झाला होता. पण आई पिंकी रोशनने असे करण्यास नकार दिला. 
- हृतिकची आई म्हणाली होती की, बालपणापासून आतापर्यंत हृतिकला त्या बोटामुळे काहीच त्रास झालेला नाही, मग तो बोट का काढायचा. 
- पिंकी रोशन मानायच्या की, देवाने हृतिकला असेच बनवले आहे, तर त्याच्या शरीरासोबत छेडछाड करण्याचा आपल्याला हक्क नाही. अखेर हृतिकने आईचे ऐकले. 
- हृतिकला 11 व्या बोटासोबत लॉन्च करण्यात आले आणि त्याचा चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला. चित्रपटाला 92 अवॉर्ड मिळाले होते. यामुळे 2002 मध्ये चित्रपटाचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. 

 

ट्रॅफिक सिग्नलवर झाली होती सुजैनसोबत भेट 
- हृतिकची सुजैनसोबत पहिली भेट 'कहो न प्यार है' रिलीज होण्यापुर्वीच झाली होती. हृतिक मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर होता. दोघंही आपापल्या कारमध्ये बसलेले होते आणि ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते. 
- हृतिकची नजर सुजैन खानवर पडली. सुजैनला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. रिपोर्ट्सनुसार सुजैनचे अफेअर बॉलिवूड अॅक्टर अर्जुन रामपालसोबत सुरु होते. यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. 
- हृतिकने आपल्या पहिल्या चित्रपटानंतर लगेच 20 डिसेंबर, 2000 मध्ये लग्न केले होते. पण दोघं 14 वर्षांनंतर वेगळे झाले. या कपलला ऋदान आणि ऋहान ही दोन मुलं आहेत. 
- घटस्फोटानंतरही ऋतिक आणि सुजैन एकमेकांसोबत खुप वेळ घालवतात. दोघंही आपल्या मुलांच्या संगोपनात कोणतीही कमतरता पडू देत नाही. आई-वडील वेगळे झाल्यामुळे मुलांवर काही वाईट परिणाम पडू नये याची ते दोघं पुरेपूर काळजी घेतात. 

 

बातम्या आणखी आहेत...