आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Salman Khan And Hrithik Roshan Travel To The United States, Netflix Office Closed

सलमान खान आणि हृतिक रोशनने लांबणीवर टाकला अमेरिकेचा प्रवास, नेटफ्लिक्सचे कार्यालयही बंद

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः कोरोनामुळे बाॅलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सलमान खान आणि हृतिक रोशनने त्यांचे टूर पुढे ढकलले असून सोहेल खानने अमेरिकेत आयोजित केलल्या कार्यक्रमाला सलमान खानने पुढे ढकलले आहे. त्यांच्या टीमने सांगितले,‘हा निणर्य कोरोनामुळे घेण्यात आला आहे. आता कोणताही प्रवास करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. हा धोका कमी झाला तर आम्ही नवीन तारखांची घोषणा करू.’ हा टूर 3 ते 12 एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला होता.


हृतिक रोशन आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी अमेरिका, शिकागो, न्यूजर्सी, डॅलेस, सॅन जोस, वॉशिंग्टन आणि अटलांटाला जाणार हाेता. परंतु, त्यानेही या कार्यक्रमांना पुढे ढकलले आहे. याशिवाय बॉलिवूड आणि हाॅलिवूडचे बरेच मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत किंवा त्यांना पुढे ढकलण्यात आले आहे.

नेटफ्लिक्सची कामे होत आहेत घरून

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सलाही कोरोना व्हायरसमुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते. कंपनीने लॉस एंजेलिसचे त्यांचे कार्यालय बंद केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा सल्ला दिला आहे. एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे निर्दशनास आल्यावर हा निर्णय घेतला. याशिवाय ‘जिम्मी किमेल लाइव्ह’, ‘द टुनाइट शो स्टारिंग जिम्मी फॅलन’ आणि ‘द लेट शो विथ स्टीफन कॉलबर्ट’सारख्या लाइव्ह शोचे प्रेक्षकांशिवायच चित्रीकरण केले जाईल, अशी घोषणा केली होती.

कलाकारांनीही केले सतर्क

 • प्रियांका चोप्राने एक व्हिडिओ पोस्ट केला आिण तिचा नमस्काराचा फोटो शेअर करून लिहिले- नमस्कारापासून सावधान.’
 • कार्तिक आर्यनचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ‘भूल भुलैया 2’ सेटवरील सर्व सदस्य मास्क लावलेले दिसत आहेत.
 • कोरोनाच्या भीतीने बिपाशा बसु आणि सोनाली बेंद्रेने अमेरिकेचा प्रवास रद्द केला आहे.

या चित्रपटांवर झाला परिणाम 

 • ‘फास्ट एंड फ्यूरियस 9’ चे प्रदर्शन निर्मात्यांनी 11 महिने पुढे ढकलले आहे.
 • डिज्नीने ‘मुलान’, ‘द न्यू म्यूटेंट्स’, ‘एंटलर्स’ चित्रपटाचे प्रदर्शनही पुढे ढकलले आहे.
 • पॅरामाउंट पिक्चर्सने ‘सॉनिक द हेजहॉग’ ची चीनमधील प्रदर्शन सध्या थांबवले आहे.
 • ‘ए क्वाइट प्लेस पार्ट 2’ हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार नाही असे या चित्रपटाचे दिग्दर्शक जॉन क्रासिंस्कीने ट्विटरवर सांगितले.
बातम्या आणखी आहेत...