आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Roshan Tells How Was His Experience Of Playing A Role Of Teacher By Erasing His Image Of Most Stylish Man

शिक्षकाची भूमिका साकारतोय आशियातील सर्वात मादक पुरुष, हृतिकने स्वत: सांगितले कशी केली आनंद कुमारच्या भूमिकेची तयारी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेनमेंट डेस्क : भारतातच नव्हे तर जगातील सर्वात हँडसम लोकांमध्ये हृतिक रोशनचे नाव घेतले जाते. त्याला आशियातील सर्वात मादक पुरुषाची पदवीदेखील मिळाली आहे. काही लोक तर त्याला ग्रीक गॉड्सदेखील म्हणतात. त्याची देखणी प्रतिमा पाहून त्याला चित्रपटात तशाच भूमिका मिळतात. मात्र त्याच्या येणाऱ्या 'सुपर 30' चित्रपटात त्याची वेगळी प्रतिमा पाहायला मिळणार आहे. यात तो सामान्य माणसाची भूमिका साकारणार आहे. तो गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे. आनंद कुमार यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी, त्यांच्या सारखे दिसण्यासाठी हृतिकला मेहनत घ्यावी लागली. जाणून घेऊया हृ़तिकने काय-काय केले.. 

 

आनंदच्या लूकमध्ये विकले पापड...  
आनंद कुमार यांच्या संघर्षातील काळ साकारणे मोठे आव्हान होते. रस्त्यावर पापड विकण्याचे दृश्य हृतिकने राजस्थानच्या ४५ डिग्रीच्या कडक उन्हात शूट केले. चित्रपटाच्या जवळच्या सूत्रानुसार, अशा वातावरणात चित्रीकरण करणे सोपे नव्हते. कारण उन्हाळ्यात टीमचे लोक घामाघूम व्हायचे आणि डिहायड्रेशनचे शिकार व्हायचे. मात्र हृतिक आपल्या पात्रासाठी कडक उन्हातदेखील रस्त्यावर फिरायचे. त्याने आनंद कुमारच्या लूकमध्ये पापड विकले. 

 

फेरीवाल्यांसाेबत चांगला मिसळला हाेता हृतिक...  
हृतिकचे अनेक लूक टेस्ट घेण्यात आले. राजस्थानात पहिल्या शेड्यूलसाठी टीम शूटिंग करत होती, तेव्हा त्याचा हा लूक फायनल करण्यात आला. शूटिंग दरम्यान हृतिक काही फेरीवाले आणि पापड विक्रेत्यांसोबत मिसळून गेला होता. तो आपल्या पात्रात एकदम फिट हाेता की त्याला काेणीच ओळखले नाही. 

 

- आठ ते दहा वेळेस भेटून जाणून घेतला आनंदचा जीवन प्रवास. 
- चार तास चालत होती बैठक, त्याचे व्हिडिओ बनवले 
- सात किलो वजन कमी केले त्यानंतर वजन वाढवले. 
- -तीन महिन्यात बिहारी भाषा शिकली, मुलांनी मदत केली. 
- 43 डिग्री तापमानात पापड विकण्याचे शूट केले 
- 30 मुलासोबत मिळून-मिसळून राहिले हृतिक रोशन 

 

मुलांनी खूप मदत केली... 
ती तीस मुले खूपच साधे सरळ होते. खरं तर, ते सर्वच क्लीन स्लेट होते. त्यांना अभिनय किंवा संवाद कसा बोलायचा शिकवले नव्हते. ती सर्व सामान्य मुले होती. त्यामुळे त्यांच्यासोबत राहिल्याने मला पात्र आत्मसात करण्यास मदत मिळाली. 

 

व्हिडिओ पाहून शिकलो बॉडी लँग्वेज...  
आनंद यांची भूमिका आत्मसात करण्यासाठी त्यांची अनेकदा भेट घेतली. त्या भेटीचे मी व्हिडिओ रिकॉर्ड केले. त्यानंतर ते रात्रभर पाहायचो आणि त्यातून मी त्यांची बाॅडी लँग्वेज शिकलो. 

 

भेटीतून जाणले व्यक्तिमत्त्व...  
त्यांना बऱ्याचदा भेटलो. एक बैठक दोन-दोन तासापेक्षा जास्त असायची. काही तर चार-चार तास चालायच्या. या बैठकीतून त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेतले. 

 

शैलीसाठी लागले तीन महिने...  
मला भाषा शैली शिकण्यासाठी तीन महिने लागले. मी सर्व तीस मुलांसोबत मिळून-मिसळून राहिलो. त्यांच्यासोबत बोलून तेथील शैली शिकलो. 

 

आधी वजन कमी केले नंतर वाढवले...  
आनंद सरांचे काही सिक्स पॅक एब्स नाहीत त्यामुळे मला त्यांच्या भूमिकेसाठी ७ किलो वजन कमी करावे लागले त्यानंतर पुन्हा वाढवावे लागले. 

 

रंग सावळा ठेवला...  
माझा रंग थोडा सावळा ठेवण्यात आला आहे. कडकड्यात उन्हात एखादा माणूस पापड विकत असेल तर तो गोरा कसू दिसू शकतो. ठेवले असते आणखी टीका झाली असती. 

 

माझ्या हाताच्या हालचालीपासून ते डोळ्यातील दु:ख आणि संघर्षाचे रिफ्लेक्शनपर्यंत मी हृतिकचा प्रयत्न पाहून हैराण झालो होतो. हृतिकने माझे पात्र आत्मसात केले. मी स्वत:लाच पडद्यावर पाहत असल्याचे मला वाटत होते. तो माझी सावली आहे, असे मला वाटत आहे.