• Home
  • News
  • Hrithik Roshan's sister Sunaina Roshan showed support to Kangana Ranaut everyone is shoked due to Sunaina's tweet

Bollywood / ऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने दर्शविला कंगना रनोटला पाठिंबा, सुनैनाच्या या ट्विटमुळे सर्वच आहेत हैराण 

'माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे' - सुनैना 

दिव्य मराठी वेब

Jun 20,2019 02:17:50 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क : बॉलीवुड अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्यात बऱ्याच काळापासून शत्रुत्व आहे. हे आता इतके विकोपाला गेले आहे की, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही आता त्यांच्या या शब्दांच्या युद्धात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. ऋतिक रोशनने बऱ्याच काळापासून कित्तेक गोष्टींबद्दल मौन बाळगण्याचा निर्णय घेतला असला तरी, कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेल या त्यांच्याबद्दलचे अनेक खुलासे करतच असतात.

अशातच कंगनाची बहीण रंगोलीने सौनैनाविषयी खूप आश्चर्यकारक खुलासे केले आणि तिने तिच्या ट्विटर हँडलवर हेदेखील सांगितले की, सुनैनाने तिला आणि कंगनाला कॉल केला होता आणि त्यांची माफी मागितली होती. रंगोलीच्या अशा ट्विटनंतर सुनैनाने अशातच केलेल्या एका ट्विटने सर्वचजण हैराण झाले आहेत. सुनैनाने ट्विट केले आहे की, 'माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे.'

काही दिवसांपूर्वी ऋतिकची बहिण सुनैना बायपोलार विकाराने ग्रस्त असल्याची अफवा पसरली होती. तथापि, तिने कोणत्याही प्रकारची मानसिक आजाराने ग्रस्त नसल्याचे सांगून नंतर अफवांना नकार दिला. तिने कबूल केले की तिला काही कौटुंबिक समस्या आहेत आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून तिला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळत नाही. आता, आता सुनैनाच्या या ताज्या ट्विटनंतर हे स्पष्ट झाले आहे की, निश्चितच सुनैना आणि रोशन कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये काहीतरी वाद नक्कीच आहेत.

X
COMMENT