आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Roshan's Sister Sunaina Said: "The Family Is Making My Family My Life Is Hell Because Of I Am In Love With A Muslim Person"

ऋतिक रोशनची बहिण सुनैना म्हणाली - 'मुस्लिम युवकाच्या प्रेमात पडल्यामुळे कुटुंबीय बनवत आहेत माझे आयुष्य नर्क...'  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : ऋतिक रोशनची बहिण सुनैनाने कंगनाच्या समर्थनात ट्विट केल्याच्या एका दिवसानंतर रंगोली चंदेलने असे ट्विट केले की, 'रोशन कुटुंबाकडून सुनैना हिला अपमानास्पद वागणूक दिली जात होती कारण ती एका मुस्लिम मुलावर प्रेम करत होती. पिंकविलाच्या मुलाखतीत, सुनैनाने तिच्या नातेसंबंधाचा स्वीकार केला आणि दावा केला की, हे घरात कुणालाही मान्य नव्हते, ना ऋतिक ना तिचे वडील राकेश रोशन यांना. तिने असादेखील आरोप केला आहे की, केवळ याचमुळे तिला तिच्या वडिलांनी चापटही मारली होती. 

 

सुनैना म्हणाली, "गेल्यावर्षी मी आणि एक मुस्लिम युवक एकमेकांच्या प्रेमात पडलो. म्हणून माझ्या वडिलांनी मला मारले आणि सांगितले की, मला आवडणारा माणूस दहशतवादी होता, जो की रुहेल नाही"

 

"मला याबद्दल बोलायचे नव्हते पण माझी इच्छा आहे की, त्यांनी आता रूहेलला स्वीकारावे कारण ते माझे जीवन नर्क बनवत आहेत आणि मी हे सहन करू शकत नाही... ते मला त्याला भेटू देऊ इच्छित नाहीत. लग्नाबद्दल मला माहित नाही पण सध्या मला रूहेलबरोबर राहायचे आहे. केवळ तो मुस्लिम असल्यामुळे ते त्याला स्वीकारत नाहीयेत." 

 

 

बऱ्याच दिवसांपासून सुनैना आपल्या जीवनात सर्व काही ठीक नसल्याचे दर्शवत आहे. आधीच्या मुलाखतीत, सुनैनाने आपल्या कौटुंबिक समस्यांविषयी सांगितले आणि म्हणाली होती, "हो, काही समस्या आहेत परंतु कृपया मला माझ्या कुटुंबाबद्दल अधिक बोलण्यास मला सांगू नका कारण यामुळे त्यांना त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही."