आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Said 'Super 30' I Was Going To Do It, Even If Somebody Threatened To Shoot, I Would Not Have Given Up '

ऋतिक म्हणाला - 'सुपर 30' तर मी करणारच होतो, कुणी गोळी घालण्याची धमकी दिली असती तरी मी तो सोडला नसता'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : 'काबिल' चित्रपट करण्याच्या जवळपास दोन वर्षांनंतर ऋतिक रोशनने आपल्या चाहत्यांना 'सुपर ३०'च्या रूपात एक अविस्मरणीय भेट दिली. मजेशीर बाब म्हणजे 'सुपर ३०' हा ऋतिकच्या सिग्नेचर चित्रपटांप्रमाणे टिपिकल अॅक्शनपट नसतानाही हृदयावर छाप सोडून गेला. सुविधांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणारे शिक्षक आनंद कुमार यांच्या पात्राने त्याला स्क्रीनवर लार्जर दॅन लाइफची एक नवीन प्रतिमा प्रदान केली आहे. प्रेक्षकांना तो या अवतारामध्ये खूप आवडला. तसेच उपराष्ट्रपती आणि इतर महत्त्वाच्या लोकांनीही त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटाने १५ दिवसांत जवळपास १२० कोटी कमावले आहेत. आपल्या करिअरमधील या खास चित्रपटाबाबतच्या भावना ऋतिकने दिव्य मराठीसोबत शेअर केल्या आहेत. 

 

'सुपर 30' सारख्या अत्यंत प्रेरणादायी कथेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे माझा धीर आणखीनच वाढला आहे. मी खूपच प्रोत्साहित झालो आहे. 'सुपर 30'ची स्क्रिप्ट माझ्याकडे आली तेव्हा ती मला खूप आवडली आणि हा प्रेरित करणारा चित्रपट तर मला करायचाच आहे, असे मनोमन ठरवले. या क्षणी जर कुणी मला गन पॉइंटवर घेऊन तुला गोळी मारून ठार करू, असे म्हणाला असता तरीदेखील मी कुणाचेच ऐकले नसते. या चित्रपटाच्या कथेने माझ्या मनावर किती खोलवर परिणाम केला, हे यावरून तुम्हाला कळू शकेल. 

 

माझ्या आयुष्यात ज्या चित्रपटांचे विषय मला मनापासून आवडले मी तेच केले. 'कहो ना प्यार है' सोबतच मी 'फिजा' नावाचा एक चित्रपट साइन केला होता. तो भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित होता. मी त्यामध्ये करिश्मा कपूरच्या भावाचे पात्र साकारले होते. 'कहो ना प्यार है' सारख्या हिट लव्ह स्टोरीनंतर मी 'फिजा'सारख्या स्क्रिप्टला होकार देण्याचे कोणतेच कारण नव्हते. तरीदेखील मी तो चित्रपट केला. कारण त्याच्या कथेने माझ्या हृदयाला स्पर्श केला होता. मी 'कोई मिल गया' सारखा चित्रपटही केला. त्यात मी आपल्या अॅक्शन प्रतिमेच्या पलिकडे जाऊन मतिमंद मुलाचे पात्र साकारले होते. त्या वेळी हे पात्र साकारू नको, असे लोक म्हणाले होते. कारण त्याच्या आधी माझे दोन-तीन चित्रपट आपटले होते. 'न तूम जानो न हम', 'आप मुझे अच्छे लगने लगे' आणि 'मैं प्रेम की दीवानी' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाही. लोक मला हेदेखील म्हणाले होते की, आता तर ऋतिक रोशनचे काही खरे नाही. अशा स्थितीमध्ये माझ्याकडे 'कोई मिल गया' आला होता. त्याच्या कथेने माझ्या हृदयाला एवढा स्पर्श केला आणि हा चित्रपट करायचाच असा निर्णय मी घेतला. चित्रपट हिट झाला तेव्हा माझा स्वत:वरील आणि आपल्या आतील आवाजावरील विश्वास आणखी वाढला. त्या चित्रपटाचे यश 'सुपर ३०' एवढे नव्हते, पण त्यापेक्षा कमीही नव्हते. त्यावेळीही माझे खूप कौतुक झाले. त्यानंतर यापुढे सो कॉल्ड स्टार व्हॅल्यू असलेली असो वा नसो, जी कथा हृदयाला स्पर्श करेल तीच मी करणार, हे मनोमन ठरवले. परिणामी 'सुपर 30' आला तेव्हा हा चित्रपट करायचाच, हे ठरवले. 

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे चित्रपट विकास आणि जनजागृतीकडे लक्ष केंद्रित करतात. अशा प्रकारच्या चित्रपटांना जेव्हा जनता, सरकार, व्यवस्था आणि बदल घडवून आणणाऱ्या सक्षम यंत्रणांकडून सपोर्ट मिळतो तेव्हा खरंच खूप चांगले वाटते. चित्रपट करमुक्त करणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे. करमुक्त झाल्यामुळे हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेरित करेल. बदल घडवून आणण्याची क्षमता या चित्रपटाच्या माध्यमातून चांगलीच वाढणार आहे.