आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Tiger's 'War' Earns Rs 53 Crore On Opening Day, The Largest Opentime Movie In Hindi

ऋतिक-टाइगरच्या ‘वॉर’ ने पहिल्याच दिवशी कमवले 53 कोटी रुपये, हिंदीमध्ये ऑलटाइम सर्वात मोठा ओपनर चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘वॉर’ ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्शच्या ट्वीटनुसार, चित्रपटाने पहील्याच दिवशी 53.35 कोटींची कमाई केली. यासोबतच तो आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर हिंदी चित्रपट बनला आहे. यापूर्वी या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन आणि आमिर खान स्टारर 'ठग्स ऑफ हिंदोस्तां' (2018) टॉपवर होता, ज्याने पहिल्याच दिवशी 50.75 कोटी रुपये कमवले होते.  

पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारे टॉप 5 हिंदी चित्रपट 
1    वॉर    2019    53.35 कोटी रुपये 
2    ठग्स ऑफ हिंदोस्तां    2018    50.75 कोटी रुपये
3    हॅप्पी न्यू ईयर    2014    44.97 कोटी रुपये
4    भारत    2019    42.30 कोटी रुपये
5    बाहुबली : द कन्क्लूजन (हिंदी वर्जन)    2017    41 कोटी रुपये

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रचला इतिहास... 
‘वॉर’ ने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे कमाईमध्येही इतिहास रचला ही पहिली वेळ आहे, जेव्हा एखाद्या हिंदी चित्रपटाने रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगने 30 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली. मात्र इतर भाषेचे चित्रपटही सामील केले गेले तर ‘वॉर’ तिसऱ्या क्रमांकावर दिसते. या लिस्टमध्ये टॉपवर हॉलीवूडचा ‘अॅव्हनेजर्स एन्ड गेम’ आणि आणि दुसऱ्या क्रमांकावर ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ आहे.  

अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत बाजी मारलेले हे आहेत टॉप 5 चित्रपट...  
1    अॅव्हेंजर्स एन्डगेम (हॉलिवूड)    2019    49.62 कोटी रुपये
2    बाहुबली : द कन्क्लूजन (साउथ इंडियन)    2017    37.53  कोटी रुपये
3    वॉर    2019    32 कोटी रुपये
4    अॅव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर (हॉलिवूड )    2018    29.14 कोटी रुपये 
5    ठग्स ऑफ हिंदोस्तां    2018    26.27 कोटी रुपये
 

बातम्या आणखी आहेत...