आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

200 कोटी क्लबमध्ये पोहोचला हृतिक-टायगरचा 'वॉर', परदेशातही करतोय रेकॉर्ड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्कः अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' हा चित्रपट 200 कोटीच्या क्लबमध्ये पोहोचण्यास सज्ज झाला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्वीटनुसार, या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने सोमवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर 20.60 कोटींचा व्यवसाय केला आहे. या आकड्यानुसार चित्रपटाचा हिंदी व्हर्जनचा एकुण व्यवसाय हा 180.30 कोटींच्या घरात पोहोचला आहे. जर यामध्ये तामिळ आणि तेलुगु व्हर्जनच्या व्यवसायाचा समावेश केला तर भारतात चित्रपटाने एकंदरीत 187.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे.

 प्रत्येक दिवसाचे कलेक्शन

दिवस  हिंदी व्हर्जनची कमाई    तामिळ+तेलुगु व्हर्जनची कमाई   एकुण कमाई
बुधवार  (2 ऑक्टोबर)  51.60 कोटी  1.75 कोटी  53.35 कोटी
गुरुवार   (3 ऑक्टोबर)  23.10 कोटी   1.25 कोटी  24. 35 कोटी
शुक्रवार (4 ऑक्टोबर)  21.30 कोटी   1.15 कोटी  22.45 कोटी
शनिवार (5 ऑक्टोबर)  27.60 कोटी  1.10 कोटी  28.70 कोटी
रविवार  (6 ऑक्टोबर)  36.10 कोटी  1.30 कोटी    37.40 कोटी
सोमवार  (7 ऑक्टोबर)  20.60 कोटी  0.9 कोटी  21.50 कोटी
एकुण कलेक्शन   180.30 कोटी   7.45 कोटी  187.75 कोटी

      

...तर 7 दिवसांत 200 कोटी कमावणारा चौथा चित्रपट 
मंगळवारी दस-याची सुट्टी बघता चित्रपटाच्या कमाईत वाढ बघायला मिळाली. मंगळवारचा बिझनेस 20 कोटींच्या घरात असल्यास चित्रपटाचे एकुण कलेक्शन हे 200 कोटींहून अधिक होईल. असे झाल्यास हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये पोहोचणारा यावर्षीचा चौथा चित्रपट ठरेल. यापूर्वी 'संजू', 'टाइगर जिंदा है' आणि 'सुल्तान' हे चित्रपट सात दिवसांत 200  कोटी क्लबमध्ये सामील झाले होते.


तीन चित्रपटांचे लाइफटाइम कलेक्शन

 चित्रपट   रिलीजचे वर्ष  लाइफटाइम कलेक्शन (भारतात)
संजू  2018   341.22 कोटी रुपये
टाइगर जिंदा है    2017  339.16 कोटी रुपये
सुल्तान   2016  300.45 कोटी रुपये

   'बाहुबली 2'चा रेकॉर्ड अद्याप कायम... हिंदीत आतापर्यंत सर्वात जलद गतीने 200 कोटी क्लबमध्ये सामील झालेला चित्रपट  'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' (हिंदी व्हर्जन) हा आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 6 दिवसांत हा आकडा गाठला होता. इतकेच नाही तर आठव्या दिवशी या चित्रपटाने 250 कोटी आणि दहाव्या दिवशी 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. आतापर्यंत हा रेकॉर्ड कुणीही मोडू शकलेला नाही.

ओवरसीजमध्ये विकेण्डला 'वॉर'चा 50 कोटींचा गल्ला  'वॉर'ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ओवरसीजमध्ये  7.040 मिलियन डॉलर अर्थातच सुमारे 50 कोटींचा व्यवसाय केला होता. पहिल्या विकेण्डला एवढी कमाई करुन हा चित्रपट 2019 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट ओवरसीजमध्ये हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि सिद्धार्थ आनंदच्या करिअरमधील सर्वात मोठा विकेण्ड ओपनर ठरला आहे.