आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Will Be Working With Bhansali After 9 Years, Will Play Haji Mastan In 'Gangubai Kathiawadi'

भन्साळींसोबत 9 वर्षांनंतर काम करणार ऋतिक, 'गंगूबाई काठियावाडी' मध्ये साकारणार हाजी मस्तानची भूमिका 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : संजय लीला भन्साळींनी 'इंशाल्लाह' बंद झाल्यानंतर 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटावर काम सुरु केले आहे. या चित्रपटात ते आलिया भट्‌टला लीड रोलमध्ये घेऊन येत आहे. आता बातमी आहे की, चित्रपटात ऋतिक रोशन, मुंबईचा डॉन हाजी मस्तानच्या रोलमध्ये दिसणार आहे. 'गंगूबाई काठियावाडी' 11 सप्टेंबर 2020 ला रिलीज होणार आहे.  

संजयने केले ऋतिकला अप्रोच... 
फिल्मफेयरच्या बातमीनुसार संजयने ऋतिकला या रोलसाठी अप्रोच केले आहे. 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट मुंबईच्या गल्ली बोळातून निघून शहरातील सर्वात खतरनाक महिलेच्या प्रवासाबद्दल सांगणार आहे की, ती कशी आणि केव्हा मुंबईचा रेड-लाइट एरिया, कमाठीपुराची सर्वात उग्र आणि क्रूर सेक्स वर्कर बनली. या चित्रपटाचे नाव आधी 'हीरा मंडी' होते आणि हा प्रियांका चोप्रासोबत बनवला जात होता, पण तेव्हा ते शक्य होऊ शकले नाही.  

'गुजारिश' नंतर आता करणार एकत्र काम...  
बातमीनुसार जर ऋतिक जर या चित्रपटाचा भाग बनला तर भन्साळींसोबत 9 वर्षांनंतर पुन्हा करण्याची ही त्याला संधी असेल. यापूर्वी दोघांनी 2010 मध्ये आलेला चित्रपट 'गुजारिश' मध्ये काम केले आहे. अशातच ऋतिकचा चित्रपट 'वॉर' ने 300 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन करून 2019 च्या ब्लॉक बस्टर चित्रपटांमध्ये सामील झाला आहे.  

'बैजू बावरा' वर करणार काम... 
'गंगूबाई' च्या रिलीजनंतर संजय पुढचे प्रोजेक्ट 'बैजू बावरा' च्या कमला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये दिवाळीला रिलीज होणार आहे. याच्याबद्दल त्याच्या प्रोडक्शन हाउसच्या इंस्टाग्राम पेजवर माहिती शेअर केली गेली आहे.