Bollywood / आजारातून सावरत ऋतिकने 'वॉर'साठी घेतले परिश्रम, स्लिप डिस्कचा त्रास असल्याने तयारीचा काळ ऋतिकसाठी कठीण गेला 

एका वर्षापासून व्यायाम करत नव्हता ऋतिक 

दिव्य मराठी

Aug 02,2019 05:57:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यशराजचा आगामी अॅक्शन चित्रपट 'वॉर'मध्ये झळकणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या तयारीसाठी ऋतिकला फक्त चार महिन्यांचाच वेळ मिळाला होता. यादरम्यान तो स्लिप डिस्कमुळेही त्रस्त होता. एवढेच नाही तर यापूर्वी तो गेल्या एक वर्षापासून शारीरिक व्यायामापासूनही दूरच होता. अशा वेळी 'वॉर'ची तयारी करत असतानाचा काळ ऋतिकसाठी खूप त्रासदायक राहिला. मात्र, तो पूर्ण ताकदीनिशी परिश्रम घेत राहिला आणि निर्मात्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरला.

'शारीरिकदृष्ट्या हा चित्रपट खूप आव्हानात्मक राहिला. अॅक्शन अवतारामध्ये येण्यासाठी मला 'सुपर ३०'नंतर केवळ चार महिने मिळाले होते. पुन्हा प्रशिक्षणास सुरुवात केली तेव्हा हे करणे खूप कठीण जाणार असल्याची जाणीव झाली. प्रशिक्षण सुरू केल्यामुळे सर्वकाही करणे त्रासदायक होते. चित्रपटात टायगर श्रॉफचा स्पर्धक असल्याने पुन्ही ती शरीरयष्टी मिळण्यासाठी मेहनत घेतली. तथापि, टिपिकल ऋतिकच्या चित्रपटांमध्ये जे काही असते, ते सर्व या चित्रपटात लोकांना पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी पुन्हा 'बँग बँग'वाला ऋतिक झालो आहे.'

एवढी मेहनत करण्याचे कारण...
- चित्रपटात उच्च पातळीची अॅक्शन आणि स्टंट दृश्ये आहेत. यासाठी ऋतिक शारीरिकदृष्ट्या फिट असणे गरजेचे होते.
- चित्रपटातील अॅक्शन दृश्ये वेगळी आहेत. टॉम क्रूझच्या चित्रपटातील अॅक्शन दृश्यांप्रमाणे ती कोरियोग्राफ करण्यात आली आहेत.
- यात त्याची स्पर्धा चित्रपटसृष्टीचा फिट अँड फाइन टायगर श्रॉफसोबत आहे. त्याची बरोबरी करणे गरजेचे होते.
- 'बँग-बँग'मध्ये जबरदस्त अॅक्शन दृश्ये केली होती. यापेक्षा चांगल्या दृश्यांची अपेक्षा बाळगून आहेत.

तयारी करताना आल्या या अडचणी...
- ऋतिकने 'सुपर 30'मुळे एक वर्षापासून शारीरिक व्यायाम केला नव्हता. पुरनरागमन करणे थोडे त्रासदायक होते.
- स्लिप डिस्कमुळेही तो या काळात त्रस्त होता. याचा परिणाम चित्रपटाचे प्रशिक्षण आणि शूटिंगवर होऊ दिला नाही.

ऋतिकने सांगितले...
ऋतिकने या चित्रपटाची तयारी सप्टेंबरपासून सुरू केली होती. त्यामुळे त्याला पुन्हा एका वर्षानंतर वर्कआऊट करण्यास त्रास होत होता. याचे अनेक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले. एक व्हिडिओ शेअर करत त्याने सांगितले, ट्रेडमिल आणि कार्डियोदेखील करू शकत नाही. पायाचा सांधाही तुटला आहे. पण ध्येय गाठायचे आहे, म्हणून आता काही बहाणा चालणार नाही.

X