• Home
  • News
  • Hrithik's film got a U certificate, Ramayana's reference was removed from 'Super 30'

Bollywood / 'सुपर-30' मधून हटवला गेला रामायणाचा संदर्भ, ऋतिकच्या चित्रपटाला मिळाले U सर्टिफिकेट

डान्समध्येही केला गेला बदल... 

दिव्य मराठी वेब

Jul 10,2019 10:34:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : बिहारचे गणित तज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट 'सुपर-30' याच आठवड्यात 12 जुलैला रिलीज होणार आहे. या सीबीएफसीने चित्रपटाला रिलीजपूर्वी 'यू सर्टिफिकेट' दिले आहे, सोबतच चित्रपटातून रामायणाचा संदर्भदेखील हटवला आहे. या डायलॉगमध्ये रामायणात याऐवजी राज पुराणात हा शब्द जोडला गेला आहे.

डान्समध्येही केला गेला बदल...
सेंसर बोर्डाने चित्रपटांत केल्या जाणाऱ्या चेंजेसमध्ये 'पैसा' या गाण्यातील दोन शॉट्सदेखील हटवले गेले आहेत. पहिला सीन ज्यामध्ये एका राजकीय नेत्याच्या हातामध्ये एक डान्सर होती आणि दुसरा सीन ज्यामध्ये नेता तिला स्पर्श करताना दिसत आहे. हे दोन्ही सीन डान्सिंग शॉट्ससोबत बदलले गेले आहेत.

सुमारे अडीच तासांचा आहे चित्रपट...
एवढेच मनही चित्रपटाच्या सुरुवातीला 10 सेकंदांचा हिंदी डिस्क्लेमरदेखील दाखवला जाईल. जो अँटी लिकर डिस्क्लेमरसोबत असेल. चित्रपटाचा कालावधी 154 मिनिटे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलने केले आहे. मेन लीडमध्ये ऋतिक रोशन आणि मृणाल ठाकुर दिसणार आहेत.

X
COMMENT