Home | News | Hrithik's sister Sunaina has been admitted to the hospital in critical condition, is suffering from bipolar disorder.

बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे ऋतिकची बहीण सुनैना, क्रिटिकल अवस्थेत रुग्णालयात केले गेले दाखल 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 10, 2019, 04:13 PM IST

सुनैनाला होते कॅन्सरसह आणखी 6 आजार... 

 • Hrithik's sister Sunaina has been admitted to the hospital in critical condition, is suffering from bipolar disorder.

  बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनची तब्येत खराब झाली आहे. तिला क्रिटिकल कंडीशनमध्ये रुग्णालयात दाखल केले गेले आहे. डॉक्टरांनी तिला 24 तास आतीसुरक्षेसाठी देखरेखीत ठेवले आहे. बातम्या आहेत की, सुनैना बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे आणि तिची मानसिक अवस्था ठीक नाही. सुनैनाच्या खालावणाऱ्या तब्येतीमुळे संपूर्ण रोशन कुटुंब परेशान आहे.

  सुनैनाला होते कॅन्सरसह आणखी 6 आजार...
  47 वर्षांच्या सुनैना रोशनने मागच्यावर्षी अनेक इंटरव्यूजमध्ये सांगितले होते की, तिचे वजन सुमारे 140 किलो होते. तिने मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये भाऊ ऋतिकच्या सांगण्यानुसार, बेरियाट्रिक सर्जरी केली होती. त्यानंतर तिचे वजन 65 किलो झाले. सुनैना जेव्हा राकेश यांच्यासोबत चित्रपट 'क्रेजी 4' मध्ये काम करत होती तेव्हा तिला खूप ब्लीडिंग झाले होते. नंतर टेस्ट केल्यांनतर कळाले की, तिला सर्वायकल कॅन्सर आहे. कीमोथेरपीदरम्यान तिचे पूर्ण केस गेले होते, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्येदेखील गेली होती.

  तिने परेशानीमध्ये जास्त खायला सुरुवात केली होती आणि घरच्यांना सोडून वेगळे राहू लागली होती. कॅन्सरव्यतिरिक्त सुनैनाला आणखी 6 आजार झाले होते, ज्यामध्ये डायबिटीज, फॅटी लीवर, हाइपरटेंशन, स्लीप एपनिया, कार्डिएक आणि दोन पाऊलेही चालल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आता सुनैना त्या आजारातून पूर्णपणे बाहेर आली आहे. ती डायरेक्शनच्या फील्डमध्ये कार्यरत आहे आणि 'टु डॅड विथ लव्ह' हे पुस्तकही लिहिले आहे.

 • Hrithik's sister Sunaina has been admitted to the hospital in critical condition, is suffering from bipolar disorder.
 • Hrithik's sister Sunaina has been admitted to the hospital in critical condition, is suffering from bipolar disorder.

Trending