आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतिकच्या 'सुपर 30' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच डायलॉग्स आणि सीन्सवर बनू लागले मीम्स, वेगाने होत आहेत व्हायरल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशन स्टारर आगामी चित्रपट 'सुपर 30' चा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. विकास बहलच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटात ऋतिक गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. 12 जुलैला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच सोशल मीडिया यूजर्सने आपले मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. जेथे काही यूजर्स ऋतिक आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत तर कुणी चित्रपटाचे डायलॉग्स आणि सीन्सवर मीम्स बनवत आहेत.  

 

सोशल मीडियावर येत आहेत अशा कमेंट्स... 
एका ट्विटर यूजरने लिहिले, "बोलण्याची पद्धत आणि बॉडी लँग्वेज पाहून असे वाटत आहे, जसे जुहूच्या राहणाऱ्या एखाद्या मुलाला इंडियन स्टाइलच्या टॉयलेटचा वापर करायला सांगतले असावे आणि त्याला काळात नसावे की आता काय करायचे ?" काही यूजर्सने चित्रपटातील 'इतना गलत कैसे हो सकते हैं भाई' आणि 'अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा' अशा डायलॉग्सवर मीम्सदेखील बनवले. 

बातम्या आणखी आहेत...