• Home
  • Gossip
  • hritik and Deepika, will be senn in remake of 'Satte Pe Satta', original movie of Amitabh Bachchan and Hema Malini

Bollywood / ‘सत्ते पे सत्ता’ च्या रीमेकमध्ये दिसणार आहेत ऋतिक-दीपिका ! अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या चित्रपटाचा आहे रीमेक 

आधी चित्रपटासाठी शाहरुख आणि कतरिनाचे नाव समोर आले होते 

दिव्य मराठी वेब

Jul 10,2019 01:12:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडचा माचो मॅन ऋतिक रोशन आणि डिंपल गर्ल दीपिका पदुकोण ‘सत्ते पे सत्ता’ च्या रीमेकमध्ये काम करू शकतात. बॉलिवूडमध्ये चर्चा आहे की, रोहित शेट्टी आणि फराह खान मिळून चित्रपट 'सत्ते पे सत्ता' चा रीमेक बनवणार आहेत. 'सत्ते पे सत्ता' मध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आधी चर्चा होती की, अमिताभ यांच्या भूमिकेसाठी शाहरुख खान आणि हेमा मालिनी यांच्या रोलसाठी कतरीना कैफला साइन केले गेले आहे. पण आता चर्चा होत आहे की, या दोन्ही भूमिकांसाठी ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणला साइन केले गेले आहे.

दीपिका आणि ऋतिकने अनेकवेळा एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण दोघांना कधीही एकत्र काम करण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता दोघे एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. फराह आणि रोहितला वाटते की, या भूमिकांसाठी ऋतिक आणि दीपिका एकदम परफेक्ट आहेत आणि ते यामध्ये फिटदेखील बसतील. सांगितले जाते आहे की, जेव्हा फराह खानने चित्रपटाची कहाणी दीपिकाला ऐकवली तेव्हा तिला ती खूप आवडली होती आणि तिने त्वरित होकार दिला होता. चित्रपटाबद्दल अद्यापही कोणती अधिकृत घोषणा झाली नाही.

X
COMMENT