आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचएसबीसी बँकेतील आणखी १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जागतिक आर्थिक मरगळीचे परिणाम आता रोजगारावरही स्पष्टपणे दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बँकिंग दिग्गज एचएसबीसी १० हजार आणखी लाेकांना नोकरीवरून काढण्याच्या तयारीत आहे. काही आठवड्यांपूर्वी बँकेच्या सीईआेंनी आपले पद साेडले हाेते आणि कमकुवत जागतिक धारणेचा हवाला देत ४ हजार लाेकांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली हाेती. बँकेचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. एका अहवालानुसार, बँक घटते व्याजदर, ब्रेक्झिट आणि ताणलेल्या व्यापार युद्धातून बाहेर पडणे कठीण हाेत आहे. बँकेचे नवे प्रमुख नाेएल क्विन खर्च घटवण्यासाठी नवी माेहीम राबवत आहेत. या माेहिमेअंतर्गत आणखी १० हजार कर्मचाऱ्यांना नाेकरीवरून काढले जाईल. नाेकरीवरून काढले जाणारे बहुतांश कर्मचारी तगडे वेतन घेत आहेत. एका सूत्रानुसार, अनेक वर्षांपासून हे जाणताे की, आम्ही खर्चाच्या माेर्चावर काही करण्याची गरज आहे आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाचा माेठा वाटा आहे.