बारावीचा निकाल वेळेत / बारावीचा निकाल वेळेत लागणार, शिक्षकांचे असहकार आंदोलन मागे

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांना अर्थ विभागाने मान्यता दिल्याने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लागणार आहे.

Feb 27,2019 09:34:00 AM IST

पुणे - राज्यातील सुमारे ७५ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांना अर्थ विभागाने मान्यता दिल्याने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लागणार आहे. परीक्षेचे पेपर तपासण्यास कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी नकार दिल्याने सुमारे ३० लाख उत्तरपत्रिका पडून होत्या. उद्यापासून सर्व शिक्षक पेपर तपासण्यास सुरुवात करणार असल्याने बारावीचा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य होणार आहे.


वित्तमंत्री व शिक्षणमंत्र्यांबरोबर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. त्यात सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रमुख मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली. बुधवारपासून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरळीतपणे सुरू होईल, असे ते म्हणाले.


या होत्या प्रमुख मागण्या
दि.२० फेब्रुवारी २०१९ रोजी अनुदानास पात्र घोषित महाविद्यालये व तुकड्यांना दि.०१ एप्रिल २०१९ पासून अनुदान देण्यात येईल, त्यासाठीची आर्थिक तरतूद चालू अधिवेशनातच करण्यात येईल. अठरा वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या सुमारे १२ हजारांवर शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत.

X