आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा राज्यात बारावीचा निकाल ८५.८८%, गतवर्षीच्या तुलनेत २.५३% ने घट; ४४७० विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारावी निकालानंतर मुंबईच्या माटुंगा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांसोबत सेल्फी घेतली - Divya Marathi
बारावी निकालानंतर मुंबईच्या माटुंगा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांसोबत सेल्फी घेतली

पुणे - विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरवणाऱ्या इयत्ता बारावीचा यंदाचा राज्याचा निकाल ८५.८८ टक्के लागला आहे. राज्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४४७० इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का २.५३ टक्क्यांनी घसरला आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२३ टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ८२.५१ टक्के इतका आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत बारावीचा निकाल जाहीर केला. यंदाही निकालावर विद्यार्थिनींच्या यशाचे वर्चस्व स्पष्ट दिसत असून, विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेची प्रमाण ९०.२५ टक्के असून विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.०४ टक्के आहे, असे डॉ. काळे म्हणाल्या. 


पुरवणी परीक्षा जुलै की ऑगस्ट? : बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी बारावीची पुरवणी परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येतील. मात्र नेमकी तारीख आणि अन्य तपशील मंडळाकडून लवकरच जाहीर केले जातील, अशी माहिती डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. 

 


यंदाही मुलींचीच बाजी : बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख २१ हजार ९३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यार्थिनींची संख्या सहा लाख ३० हजार २५४, तर विद्यार्थ्यांची संख्या सात लाख ९१ हजार ६८२ होती. एकूण १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मुलांपेक्षा मुलींचा निकाल ७.८५ टक्क्यांनी अधिक आहे. 


सैराट फेम आर्चीला बारावीत ८२% गुण 

टेंभुर्णी - सैराट चित्रपटात आर्चीची आजरामर भूमिका करणाऱ्या प्रेरणा ऊर्फ रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने यंदा बहिस्थ विद्यार्थी म्हणून बारावी परीक्षा टेंभुर्णी (ता. माढा) येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम विद्यालयाच्या केंद्रातून दिली होती. 

 

विभागनिहाय निकाल 
कोकण 93.23 
पुणे 87.88 
अमरावती 87.55 
औरंगाबाद 87.29 
कोल्हापूर 87.12 
लातूर 86.08 
नाशिक 84.77 
मुंबई 83.85 
नागपूर 82.51