आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल : हिंगाेलीचा सर्वात कमी, तर औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी १२ वीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. यात औरंगाबाद विभागाचा निकाल ८७.२९ तर लातूर विभागाचा निकाल ८६.०८ टक्के लागला. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद (८९.८२), बीड ८८.२७, परभणी ८४.५१, जालना ८७.१२ आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८०.७७ टक्के लागला. लातूर विभागात नांदेड जिल्ह्याचा निकाल ८६.२०, उस्मानाबाद ८२.७२, लातूर जिल्ह्याचा निकाल ८७.५० टक्के लागला. मराठवाड्यातील दोन्ही विभागांतून निकालात औरंगाबाद जिल्ह्याने बाजी मारली. आठही जिल्ह्यांत मुलांपेक्षा मुलांचेच उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. औरंगाबाद विभागात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.०९ तर मुलींचे ९०.८६ टक्के इतके आहे. लातूर विभागात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.१९ तर मुलींचे ९१.२४ टक्के आहे. 

 

जालना जिल्ह्याचा ८७.१२ टक्के निकाल
जालना जिल्ह्याचा ८७.१२ टक्के निकाल लागला आहे. जालना जिल्ह्यात १३ हजार ८६९ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. यंदा जिल्ह्यातील २८ हजार ४५५ विद्यार्थी बारावीची परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी २४ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १० हजार २१८ मुलींनी परीक्षा दिली. यापैकी ९ हजार २८५ मुली उत्तीर्ण झाल्या तर १८ हजार २३७ मुलांपैकी १५,५०३ उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पाच टक्यांनी जास्त आहे. निकाल पाहण्यासाठी मुलांनी नेट कॅफे, मोबाईल तसेच, एमएससीआयटीच्या केंद्रांवर गर्दी केली होती.

 

नांदेड  जिल्ह्याचा निकाल ८६.२० टक्के
लातूर विभागात निकालात लातूर जिल्हा प्रथम स्थानी तर नांदेड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण ३६ हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ३१ हजार ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 
 

> एकूण २० हजार ४१५ मुलांनी परीक्षा दिली. त्यातील १६ हजार ८६९ मुले झाली उत्तीर्ण  
> मुलांच्या निकालाचे प्रमाण ८२.६३ टक्के आहे. एकूण १५ हजार ६२९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार २०१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. 

> मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.८६ टक्के आहे.  १२३० पुनर्परीक्षर्थींपेक्ी ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 
 

 

हिंगोलीचा विभागात सर्वात कमी निकाल
बारावीच्या निकालामध्ये हिंगोली जिल्ह्याने तळ गाठला आहे. जिल्ह्याचा एकूण सरासरी निकाल ८०.७७ टक्के एवढा म्हणजेच औरंगाबाद विभागात शेवटून पहिला आला आहे.  हिंगोली जिल्ह्यात एकूण १२ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ६१७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ४३९६ विद्यार्थी प्रथम तर ४९७३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.   १८१  विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये पास झाले आहेत. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १० हजार १६७ विद्यार्थी म्हणजेच केवळ ८०.७७ टक्के विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत.  शाखानिहाय निकालामध्ये वाणिज्य शाखेने बाजी मारली असून या शाखेतील ९०.४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

 

१२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
> ४३९६ विद्यार्थी प्रथम 
> ४९७३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण 

 

बीड जिल्हा विभागात दुसऱ्या स्थानी
बारावीच्या निकालात नेहमी विभागात प्रथम स्थानी राहणारा बीड जिल्हा गतवर्षीपासून मात्र, दुसऱ्या स्थानी आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या राज्य उच्च माध्यमिक बोर्डाच्या निकालातही ८८.२७ टक्के निकालासह बीड दुसऱ्या क्रमांकावर आहे. गतवर्षी इतकाच यंदाही निकाल लागला आहे. जिल्ह्यातून यंदा  ३७ हजार ८९० विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज केले होते. या पैकी ३७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली होती.  या पैकी ३३ हजार ३६३ जणांनी बारावी गड सर केला असून यात २० हजार ७०१ मुले तर १२ हजार ६६२ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.९२ इतके आहे तर मुलींचे प्रमाण ९०.५७ आहे. जिल्ह्याच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी  मारली आहे.   बीड ९२.३७, पाटोदा ९०.५०, आष्टी ८६.९१, गेवराई ८८.७४, माजलगाव ८०.६७ अंबाजोगाई ८१.४६, केज ९३.८२, परळी वै. ७९.५१, धारूर ८५.२, शिरूर ९१.३६, वडवणी ९१.७१ टक्के निकाल लागला. 
 

३७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
> ३३ हजार ३६३ उत्तीर्ण {८६.९२% मुले उत्तीर्ण
> ९०.५७% मुली उत्तीर्ण 

 

लातूर जिल्ह्याचा निकाल 
लातूर बोर्डाचा  ८६़.०८% निकाल लागला आहे. लातूर विभागातील उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांमधून  ८५ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील ७३ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .

> लातूर विभागात विज्ञान शाखेतून ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

>  त्यातील  ३३ हजार ५९५ उत्तीर्ण झाले आहेत.  तर वाणिज्य शाखेतून १० ८३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ९ हजार ९७० उत्तीर्ण झाले आहेत.  कला शाखेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३४२८४ इतकी होती.  २६ ८९३ विद्यार्थी पास झाले.

 

उस्मानाबाद जिल्ह्याला कॉपीमुक्तीचा दणका
कॉपीमुक्ती अभियानाच्या दणक्यामुळे सलग चार वर्षांपासून महाविद्यालयांच्या मर्यादा उघड्या पडत आहेत. या वर्षीही १२ वीच्या निकालामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ०.९२ टक्क्यांनी घट झाली असून विज्ञान शाखेत तर तब्बल ४.५४ टक्क्यांनी घट झाली आहे.  जिल्ह्याचा एकूण निकाल ८२.७२ टक्के लागला आहे. याही वर्षी मुलांपेक्षा मुलींनी  बाजी मारत मुलांपेक्षा १३.७४ टक्क्यांनी आपला निकाल वधारला आहे.  विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे  प्रमाण ०.९२ टक्क्यांनी घटले असून गतवर्षी ८३.६४ टक्के निकाल असताना यावर्षी ८२.७२ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात एकूण १५ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, १५ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १२ हजार ९५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  
 

एकूण निकाल ८२.७२ टक्के  
>  १५ ६५९ परीक्षार्थी  
> १२ हजार ९५३ विद्यार्थी झाले उत्तीर्ण

 

परभणी जिल्ह्याचा निकाल ८४.५१ टक्के

निकालात परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात चौथ्या स्थानावर राहिला आहे. ८४.५१ टक्के  निकाल लागला आहे.  सेलू तालुका  अव्वल राहिला. ८९.७८ टक्के निकाल राहिला. मानवतचा निकाल मात्र ७५.६० टक्के लागून तालुका शेवटच्या स्थानावर राहिला.   मुलींनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.४०  तर मुलांचे प्रमाण ८०.७३ टक्के इतके आहे.  सेलू तालुका ८९.७८, परभणी ८७.२५, पूर्णा ७९.०५, गंगाखेड ८९.८५, पालम ८४.९९, सोनपेठ ८५.७७, जिंतूर ८५. टक्के, पाथरी ८४.१९ तर मानवतचा ७५ टक्के निकाल लागला आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल  ८९.२२ टक्के

बारावी परीक्षेचा औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८९.२२ टक्के लागला आहे. मागील सात वर्षांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी अाहे.   निकाल २.५३ टक्क्यांनी घसरला आहे.  जिल्ह्यातून ६० हजार ७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५३ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी विज्ञान, कला आणि वाणिज्य अशा सर्वच शाखेचा निकाल यंदा घसरल्याचे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले. विज्ञान शाखेचा निकाल ९२.६० टक्के, कला शाखेचा ७६.४५ टक्के  तर वाणिज्य शाखेचा निकाल ८८.२८ टक्के निकाल लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...