• Home
  • Business
  • HTC Wildfire X With Triple Rear Cameras Launched in India know features Price Specifications

Gadget Desk / एचटीसी कंपनीने केले कमबॅक; ट्रिपल रिअर कॅमरे असलेला वाइल्ड फायर X स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स


HTC ने फोनला फक्त सिंगल ब्लू कलरमध्ये लॉन्च केले आहे

दिव्य मराठी

Aug 15,2019 04:59:00 PM IST

गॅजेट डेस्क- तायवानची स्मार्टफोन कंपनी एचटीसीने त्याच्या नवीन वाइल्ड फायर X ला भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. याला दोन व्हॅरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. याच्या 4 जीबी रॅम असलेल्या व्हॅरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. फोनमध्ये प्रीलोडेड मायबडी फीचर मिळेल, जे फोनला सिक्योरिटी देते. फोनची विशेषता म्हणजे याचा ट्रिपल रिअर कॅमरा, वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले. फोनसोबत 6 महिन्यांचे अॅक्सीडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन आणि पिक-अँड-ड्रॉपची सुविधा आहे.


कंपनीने जून 2018 मध्ये डिझायर 12 आणि डिझायर 12+ नंतर भारतीय बाजारात आपला कोणताच फोन लॉन्च केला नव्हता, इतक्या दिवसानंतर वाइल्ड फायर X ला लॉन्च केले आहे.


एचटीसी वाइल्ड फायर X ची किंमत आणि ऑफर
कंपनीने एचटीसी वाइल्ड फायर X ला दोन व्हॅरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. याच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हॅरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे.

एचटीसी वाइल्ड फायर X के बेसिक स्पेसिफिकेशन

डिस्प्ले साइज 6.22 इंच
डिस्प्ले टाइप एचडी प्लस, 720x1520 पिक्सल, आयपीएस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले
ओएस अँड्रॉयड 9 पाय
प्रोसेसर ऑक्टाकोर प्रोसेसर
रॅम 3 जीबी/4 जीबी
स्टोरेज 32 जीबी/128 जीबी
रिअर कैमरा 12+8+5 मेगापिक्सल विद डुअल टोन एलईडी फ्लैश
फ्रंट कॅमरा 8 मेगापिक्सल
कनेक्टिविटी 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप सी, 3.5 एमएम हेडफोन जॅक
बैटरी 3,300 एमएएच, 10 वॉट सपोर्ट
डायमेंशन 156.7x74.9x7.95
X