आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Huawei टेक कंपनीच्या मालकाची मुलगी तसेच CFO मेंगला कॅनडात अटक, अमेरिकेत प्रत्यर्पणाची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओटावा - चीनच्या सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक ह्युवईच्या चीफ फायनांशियल ऑफिसर (CFO) मेंग वानझू यांना कॅनडात अटक करण्यात आली आहे. अधिकाकाऱ्यांनी जारी केलेल्या माहितीनुसार, वेंग यांना 1 डिसेंबर रोजीच अटक करण्यात आली होती. आता तिच्या अमेरिकेत प्रत्यर्पणाची तयारी केली जात आहे. वेग वानझू Huawei टेक कंपनीच्या संस्थापक, मालकाची मुलगी असून ती कंपनीची नंबर दोनची प्रमुख आहे. तिला अटक का करण्यात आली यासंदर्भातील अधिकृत माहिती अद्याप जारी करण्यात आली नाही.

 

इराणवरील निर्बंधांचा फटका?
अमेरिकेने किंवा कॅनडाने या अटकेचे अधिकृत कारण अद्याप दिलेले नाही. तरीही ह्युवई कंपनीच्या सीएफओंना झालेली अटक हा इराणवरील निर्बंधांचा फटका मानला जात आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध कमी करण्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे सर्वच प्रयत्न आणि इराण अणु करार सुद्धा फौल ठरवले. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हटवलेली इराणवरील औद्योगिक बंधने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पुन्हा लागू केली. त्याच निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वेंग अटक करून अमेरिकेत पाठवले जात आहे अशी चर्चा आहे. दरम्यान, कॅनडातील चिनी दूतावासाने या अटकेचा तीव्र निषेध केला. तसेच वेंग यांची ताबडतोब सुटका करण्यात यावी असे आवाहन केले आहे.

 

90 दिवसांचा करार कुचकामी
उल्लेखनीय बाब म्हणजे, जी-20 शिखर संमेलनात टॅरिफवरील वादावर तोडगा काढण्यासाठी या दोन्ही देशांनी 90 दिवसांचा शांतता करार केला होता. परंतु, अचानक चीनच्या बड्या टेक कंपनीच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक केल्याने त्यांच्यातील वाद आणखी उफाळून येऊ शकतो.

 

काय म्हणाले, कॅनडाचे अधिकारी?
गेल्या काही दिवसांपासून कॅनडात ह्युवई टेक फर्म कंपनीच्या मालकाच्या मुलीला ताब्यात घेतल्याची चर्चा चीनमध्ये सुरू होती. कॅनडाच्या कायदा मंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिला. तसेच वेंग वानझू यांना कधी आणि कुठे अटक झाली याची माहिती दिली. परंतु, त्यांना अटक कोणत्या कलमांखाली करण्यात आली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. अमेरिकेकडून वेंग यांच्या प्रत्यर्पणाची मागणी होत आहे. सोबतच, वेंग यांनी आपल्या जामीनासाठी सुद्धा याचिका दाखल केली आहे. या दोन्ही प्रकरणांवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे असे कॅनडाने स्पष्ट केले. कंपनीने याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...