Home | Business | Gadget | Huawei Y9 2019 smartphone launched with Party Mode feature

Huawei ने लाँच केला नवीन स्मार्टफोन, हे आहे या फोनचे वैशिष्ट्य, फक्त इतकी आहे किंमत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 12:05 PM IST

6.5 इंच फुल व्ह्यू स्क्रीन आणि 4000 mAh ची दमदार बॅटरी

 • Huawei Y9 2019 smartphone launched with Party Mode feature


  नवी दिल्ली : चीनी मोबाइल कंपनी हुवावेने आपला Huawei Y9 (2019) हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँज केला. या फोनमध्ये फ्रंट पॅनलवर डिस्प्ले नॉचसोबत दोन सेल्फी सेंसर देण्यात आले आहेत. तर याच्या पाठीमागे दोन रिअर कॅमेरे, फिंगरपप्रिंट सेंसर आणि ग्रेडिएंट फिनिश बॅक पॅनल दिलेले आहे. 6.5 इंच डिस्प्ले, दोन रिअर आणि दोन फ्रंट कॅमेरे. हायसिलिकॉन किरिन 710 प्रोसेसर आणि 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची Amazon.in वर अधिकृतरित्या विक्री करण्यात येणार आहे. तसेच यासोबत 2,990 किमतीचे Boat Rockerz Sports ब्लूटूथ हेडफोन मोफत देण्यात येत आहे.

  फोनचे स्पेसिफिकेशन्स
  6.5 इंच फुलव्ह्यू डिस्प्ले
  710 प्रोसेसर
  12 मेगापिक्सलचा रिअर आणि फ्रंट कॅमेरा
  16 आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  कॅमेरा सेटअपसाठी एआई फीचर
  स्टोरेज - 64 जीबी इंटरल आणि 256 जीबी एक्सपांडेबल

  हा फोन 3 जीबी आणि 4 जीबी दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे.


  हे काय खास फीचर
  या फोनमधील पार्टी मोड हे एक अनोखे फीचर आहे. याद्वारे हुवावे फोन वापरणारे 5 जण आपआपसांत कनेक्ट करू शकतात. यामध्ये फिंगरपप्रिंट 4.0 आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान आहे. तसेच अपग्रेड झालेल्या फिंगरपप्रिंट टेक्नोलॉजीमध्ये फिंगरपप्रिंट नेव्हिगेशन देखील देण्यात आले आहे. याच्या मदतीने युझरला एकाच की ने सर्व नोटिफिकेशन हाताळता येणार आहे.

Trending