Home | Flashback | Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

‘हम आपके हैं कौन’ची 24 वर्षे : एवढ्या वर्षांत अशी दिसते स्टारकास्ट, 2 कलाकार नाहीत या जगात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 05, 2018, 11:05 AM IST

5 ऑगस्ट 1994 रोजी 'हम आपके है कौन' हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या रिलीजला आज 24 वर्षे पूर्ण झाली आह

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  5 ऑगस्ट 1994 रोजी 'हम आपके है कौन' हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या रिलीजला आज 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. फॅमिली ड्रामा असलेल्या या सिनेमाने त्यावेळी यशाचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. शंभर कोटींची कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरला होता.

  राजश्री बॅनरच्या या सिनेमामुळे सलमान खान आणि माधुरी दीक्षितचे करिअर यशोशिखरावर पोहोचले. भारतीय मुल्य, परंपरा, रोमान्स आणि संस्कारांचे मिश्रण असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर तब्बल 21 वर्षांनी सलमान आणि सूरज बडजात्या राजश्री बॅनरच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातून एकत्र आले होते.

  चला जाणून घेऊया, सिनेमाची स्टारकास्ट आता म्हणजे 23 वर्षांनंतर काय करत आहेत...

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या आता काय करतात या सिनेमातील कलाकार...

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  आता या जगात नाहीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि रिमा लागू

   

  या चित्रपटात लक्ष्मीकांत बर्डे आणि रिमा लागू या मराठी कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका वठवल्या होत्या. आज हे दोन्ही मोठे कलाकार या जगात नाहीत. 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्मीकांत यांचे निधन झाले. तर याचवर्षी रिमा लागू यांचे 18 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली.   

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  रेणुका शहाणे

   

  या सिनेमानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे जणू घराघरांतील फेव्हरेट सून बनल्या होत्या. त्यांनी या सिनेमात सलमानच्या वहिनीची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या सिनेमानंतर रेणुका यांनी काही बॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. काही वर्षांपूर्वी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रिटा' या सिनेमाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. रेणुका आता 50 वर्षांच्या आहेत. 

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  प्रिया बेर्डे

   

  सिनेमात चमेलीची भूमिका प्रिया बेर्डेने साकारली होती. प्रिया बेर्डे या मराठी इंडस्ट्रीतील ख्यातनाम अभिनेत्री आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचे पती होते. त्यांना स्वानंदी आणि अभिनय ही दोन मुले आहेत.

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  सलमान खान 

   

  या सिनेमात प्रेम नावाच्या साध्यासरळ तरुणाची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. सलमानच्या गेल्यावर्षीरिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. तर यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला बजरंगी भाईजान हा सिनेमा मात्र आपटला. सध्या सलमान आगामी 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.  

   

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

   माधुरी दीक्षित

   

  आपल्या अदा आणि ठुमक्यांनी लाखो मनांवर राज्य करणारी माधुरी दीक्षित आजही प्रेक्षकांची फेव्हरेट अभिनेत्री आहे. 'गुलाब गँग' (2014) हा तिचा सिनेमा रिलीज झाला होता. सध्या माधुरी जाहिरातींमध्ये दिसत असते.   

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  मोहनीश बहल 

   

  आदर्श मुलगा, भाऊ, पतीच्या भूमिकेत हिट झालेला मोहनीश बहल आजही सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये कार्यरत आहे.  

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  हिमानी शिवपुरी 

   

  सिनेमात चाची जानची भूमिका वठवणा-या हिमानी शिवपुरी यांनी अनेक सिनेमे आणि टीव्ही शोज केले आहेत. कॅरेक्टर रोल्ससाठी त्यांना ओळखले जाते. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. छोट्या पडद्यावर ससुराल सिमर का, डॉलर बहू या मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. सध्या त्या फिल्म्सच्या ऑफर्स नाकारत असून छोट्या पडदयाकडे लक्ष देत आहेत.

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  अनुपम खेर 

   

  गमतीशीर अंदाज आणि मनमौजी स्वभावाच्या प्रतिमेत झळकलेले अभिनेते अनुपम खेर सिनेमाच्या रिलीजच्या 23 वर्षांनंतरही फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. 

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  बिंदू

   

  70च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री राहिलेल्या बिंदू यांनी 'हम आपके है कौन' या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 'ओम शांती ओम', 'मैं हू ना' या सिनेमांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. 65 वर्षीय बिंदू आता आपल्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगत असून नव-याला बिझनेसमध्ये मदत करतात.

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  सतीश शाह

   

  शायरी ऐकवणा-या मामाच्या भूमिकेत झळकलेल्या सतीश शाह यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सैफ अली खान स्टारर 'हमशकल्स' या सिनेमात झळकले होते.

   

   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

   साहिला चड्ढा

  सिनेमात रिटा हे पात्र साहिलाने साकारले होते. 'हम आपके है कौन' सोबतच 'वन टू का फोर' या सिनेमात ती छोटेखानी भूमिकेत झळकली होती. निमल बाली या अभिनेत्यासोबत तिचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे.
   

 • Hum Apake Hai Kaun Completed 24 Years

  दिलीप जोशी 

  1994 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दिलीप जोशी झळकले होते. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या गाजत असलेल्या मालिकेत ते जेठालालच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी काही निवडक सिनेमांमध्येच काम केले आहे.
   

Trending