रंजक तथ्य / मृत्यूनंतरही माणसाचे शरीर हालचाल करू शकते. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांचा दावा

शास्त्रज्ञ एलिसन यांनी मृतदेहावर 17 महीने रिसर्च केला

Sep 19,2019 11:33:08 AM IST

सिडनी- मृत्यूनंतरही माणसाचे शरीर अंदाजे 1 वर्ष हालचाल करू शकते. हा दावा ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ एलिसन विल्सन यांनी आपल्या रिसर्चमध्ये केला आहे. त्यांनी एका मृतदेहावर 17 महिन्यांपर्यंत रिसर्च केला आण त्याची प्रत्येक हालचाल कॅमेरात कैद केली.

एलिसन यांचे म्हणने आहे की, मृत्यूनंतरही मानवी शरीरात काही प्रमाणात गती असते. त्यामुळेच अनेकवेळा माणूस जिवंत असल्याचा भास होतो.


शरीर वाळल्यामुळे हालचाल होते
एलिसन विल्सन यांनी सांगितल्यानुसार, रिसर्चच्या सुरुवातीला मृतदेहाच्या हातांना शरीरासोबत चिटकून ठेवण्यात आले होते. पण हळु-हळू दिसले की, हात बाहेर आलेत. त्यांनी सांगितले की, बहुदा डीकंपोजिशनमुळे असे झाले असावे. वेळेनुसार जसे शरीर वाळत जाते, तसं-तसे त्यात मुव्हमेंट होते.


एलिसन म्हणतात की, या रिसर्चमधून मर्डर आणि मृत्यूच्या तपासात मदत मिळेल. मृतदेहावर रिसर्च करण्यासाठी एलिसन प्रत्येक महिन्यात तीन तासांची फ्लाइट घेऊन कॅर्न्सवरुन सिडनीला जात होत्या. हा रिसर्च सिडनीमध्ये होत होता. मानवी शरीराची मुव्हमेंट ऑब्जर्व करण्यासाठी टाइम लॅप्स कॅमरा लावला होता, जो प्रत्येक 30 मिनीटांनी मृतदेहांची मुव्हमेंटचे फोटो घ्यायचा.

X