Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | human nature according to chin

स्त्री असो वा पुरुष : हनुवटी पाहूनही समजू शकतात व्यक्तीच्या स्वभावाच्या खास गोष्टी

रिलिजन डेस्क | Update - Jan 08, 2019, 03:09 PM IST

समुद्र शास्त्रानुसार हनुवटी विविध प्रकारची असते. हनुवटीच्या बनावटीनुसार व्यक्तीच्या गुण-अवगुण तसेच स्वभावासंबंधी माहिती

 • human nature according to chin

  मनुष्याच्या चेहर्‍यावरील प्रत्येक अवयव त्याला सुंदर बनवण्यासाठी आवश्यक असतो. जर चेहर्‍यावरील कोणताही अवयव काढला तर चेहरा विद्रूप दिसेल. आज आम्ही चेहर्‍याच्या सर्वांत खालचा भाग हनुवटी संबंधित विशेष माहिती सांगत आहोत. समुद्र शास्त्रानुसार हनुवटी विविध प्रकारची असते. हनुवटीच्या बनावटीनुसार व्यक्तीच्या गुण-अवगुण तसेच स्वभावासंबंधी माहिती करून घेणे शक्य आहे.


  सामान्य हनुवटी -
  अशी हनुवटी शुभ फलदायक असते. अशा प्रकारची हनुवटी ओठांच्या ठीक खाली समांतर रुपात असते. अशा प्रकारची हनुवटी असणारे लोक नेहमी सत्य बोलणारे आणि आपल्या नियमांचे पालन करणारे असतात. हे लोक गंभीर आणि कमी बोलणारे असतात. हे कमी बोलतात, परंतु जे काही बोलतात ते कामाचे बोलतात. हे लोक प्रत्येक काम निःस्वार्थ भावनेने करतात. यामुळे हे लोक समाज आणि कुटुंबात लोकप्रिय असतात. आर्थिक स्वरूपातही हे संपन्न असतात.


  गोल हनुवटी -
  ज्या लोकांची हनुवटी गोलाकार असते, ते छोट्या-छोट्या गोष्टींवर रागात येतात. हे प्रत्येक काम घाईगडबडीत करतात, यामुळे कधीकधी यांच्या पदरी अपयश पडते. हे लोक स्वतःला धाडसी दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु आतून हे घाबरट असतात. हे लोक स्पष्टवक्ते असतात.


  लांब हनुवटी -
  ज्या लोकांची हनुवटी सामान्य हनुवटीपेक्षा थोडीशी लांब असते, अशा लोकांमध्ये विविध गुण असतात. अशा प्रकराची हनुवटी असणार्या लोकांचे मन स्थिर असते. हे लोक लक्ष्य निर्धारित करून ते प्राप्त करण्यासाठी संघर्ष करतात. ठरवलेले काम पूर्ण होईपर्यंत हे शांत बसत नाहीत.


  चेहर्‍याच्या आत दबलेली हनुवटी -
  अशा प्रकारची हनुवटी चेहर्‍याच्या थोडीशी आत दबलेली असते. अशा प्रकारची हनुवटी असणारे लोक जास्त चंचल स्वभावाचे असतात. तसेच हे आळसी, नकारत्मक विचार करणारे असतात. हे मानसिकरीत्या पूर्ण स्वस्थ नसतात. हे खूप जास्त बोलणारे असतात. जास्त आणि व्यर्थ बोलण्याच्या सवयीमुळे लोक यांच्यापासून दूर राहतात. हे लोक कोणत्याही कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतात परंतु अति उत्साहामुळे कधीकधी हास्यास्पद बनतात. कुटुंब आणि समाजात यांना विशेष असा मान-सन्मान मिळत नाही.


  इतर प्रकारच्या हनुवटी संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • human nature according to chin

  चेहर्‍याच्या पुढे हनुवटी -
  अशा प्रकारची हनुवटी असलेले लोक आपल्या कामाच्या बाबतीत कर्मठ आणि प्रयत्नशील असतात परंतु तरीही यांच्यामध्ये बरेच अवगुण असतात. हे लोक स्वार्थी आणि पैशासाठी काहीही करण्यास तयार तसेच धूर्त आणि कपटी असतात. यांच्यावर लवकर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे लोक कारण नसताना कोणत्याही व्यक्तीशी वाद घालण्यास तयार असतात. हे कोणाचेही ऐकत नाहीत आणि मनाला वाटेल तसे वागणारे असतात. यांचे कुटुंबीयसुद्धा यांच्या अशा वर्तणुकीमुळे चिंतीत राहतात.

 • human nature according to chin

  पसरट हनुवटी -
  अशा प्रकारची हनुवटी सामान्य हनुवटीपेक्षा थोडीशी पसरट असते. अशा प्रकारची हनुवटी असणारे लोक एकांतप्रिय असतात. हे लोक आपल्या मनातील गोष्ट कोणालाही सांगत नाहीत. हे खूप भावूक स्वभावाचे असतात आणि कोणतेही काम मन लावून करतात. हे नेहमी सत्याची बाजू घेणारे असतात. एवढे गुण असूनही यांच्यामध्ये काही अवगुण असतात. यांच्यामध्ये काम भावना जास्त प्रमाणात असते. हे लोक दिवस स्वप्न पाहणारे असतात. कधीकधी हे वास्तविकता सोडून भलत्याच विश्वात रममाण होतात, या कारणामुळे यांना अडचणींना सामोरे जावे लागते.

Trending