आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Human Skeletons Found In Ballia Sealdah Express, Smuggler Arrested By Railway Police

50 मानवी कवट्या आणि सांगाड्यांसह प्रवाशाला अटक; तस्करीमागे आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे उघड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार- छपरा रेल्वे स्थानकावरुन मानवी हाडांची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. संजय प्रसाद असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बलिया-सियालदह एक्सप्रेसने प्रवास करत होता. रेल्वे पोलीस उप-अधीक्षक तनवीर अहमद यांनी सांगितल्यानुसार उत्तरप्रदेशातून दारुची तस्करी करणाऱ्यांविरोधात तपास सुरू असताना छपरा जंक्शनवर ट्रेन क्रमांक 13106 बलिया-सियालदह एक्सप्रेस पोहचल्यानंतर शोधकारवाई सुरू असताना संजयकडून मानवी सांगाडे जप्त करण्यात आले आहे.

 

मानवी कवट्या आणि सांगाड्यांचा उपयोग वेगवेगळ्या देशांमध्ये तंत्रमंत्रासाठी

संजयकडून 16 मानवी कवट्या आणि 34 सांगाडे जप्त करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्याकडून नेपाळ आणि भूतानचे चलन, दोन ओळखपत्र, अनेक देशांतील एटीएम कार्ड आणि एक विदेशी सिम कार्डदेखील जप्त केल्याची माहीती पोलीस उप-अधीक्षक (रेल्वे) तनवीर अहमद यांनी दिली आहे.

 

पोलीस उप-अधीक्षक (रेल्वे) तनवीर अहमद यांनी सांगितल्यानूसार, मानवी कवट्या आणि सांगाड्यांच्या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय संबंध आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथून त्याने सांगाडे विकत घेतले होते, आणि भूतानमार्गे ते चिनला पोहोचवायचे होते असे त्याने कबुल केले. अटक केल्यानंतर पोलिसांनी संजयला तुरुंगात धाडले असून त्याच्या इतर साथीदारांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या मानवी कवट्या आणि सांगाड्यांचा उपयोग वेगवेगळ्या देशांमध्ये तंत्रमंत्रासाठी मोठ्या किंमतीत विकत असल्याने संजय प्रसादचा मानवी सांगाड्यांचा पुरवठा करणाऱ्या टोळीत समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...