आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम्राटांची माणुसकी दिसते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मगध सम्राट अशोकांनी आपले विजयी अभियान कलिंगपर्यंत वाढवलेले होते. आपल्या शिबिरात विचारमग्न असताना सेनापती जयगुप्तांनी येऊन कलिंगच्या युद्धात विजयश्री प्राप्त झाल्याची आनंद वार्ता दिली. सेनापतीच्या तोंडून विजयाची वार्ता ऐकताच सम्राटांच्या आनंदास पारावार उरला नाही. जयगुप्त तेथून जाण्यास निघणार इतक्यात एका बौद्ध भिक्षूंचे तेथे आगमन झाले. भिक्षूने सम्राटास सांगितले, महाराज, या युद्धात तुमचा विजय नव्हे, तर पराजय झाला आहे. सम्राटांना आश्चर्य वाटले. त्यांनी जयगुप्ताकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी तर खोटे काहीच बोललो नाही. भिक्षू म्हणाला, आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन पाहा, तुम्ही हरलात की जिंकला आहात. सम्राटांनी युद्धभूमीवर जाऊन चहुबाजूंनी नजर टाकली तेव्हा त्यांना आक्र ोश-जखमी सैनिकांचे
विव्हळण्याचे, रडण्याचे आवाज येत होते. या युद्धात कोणाचा पती, कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ मृत्युमुखी पडलेला होता. भिक्षू म्हणाला, अशा अनेक गावांतील संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सम्राटालाही ते दृश्य पाहून वाईट वाटले. भिक्षू म्हणाला, तुम्ही याला विजय मानणार का? सम्राट अशोक म्हणाले, तुम्ही खरेच बोलत आहात. हा नरसंहार पाहून मला वाटते की, माझा घोर पराजय झाला आहे. सम्राट जिंकला असेल; पण त्याच्यातील माणूस हरला आहे. आजपासून मी प्रतिज्ञा करतो की, मी यापुढे युद्ध करणार नाही. त्यांनी भगवान गौतम बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले.