आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इलेक्ट्रिक अवतारात परत येत आहे हमर एसयूवी, 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यासाठी लागतील फक्त 3 सेकंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टेस्लाच्या सायबरट्रकसोबत असेल टक्कर

ऑटो डेस्क- 2010 मध्ये बंद झालेली लोकप्रिय एसयूवी हमर आता इलेक्ट्रिक अवतारात कमबॅक करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच हमरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला आणेल, ज्यात एक हजार हॉर्स पॉवरची शक्ती असेल. या गाडीला 100 किमीच्या वेगावर पोहचण्यासाठी फक्त 3 सेकंदाचा वेळ लागेल. नवीन हमर इलेक्ट्रिकला मे 2020 आणले जाऊ शकते तर 2021 पर्यंत याची विक्री सुरू होऊ शकते. या गाडीला जनरल मोटर्स डिट्रोइट फॅक्टरीच्या जीएमसी ब्रँड अंतर्गत विकले जाईल. लवकरच फॅक्टरी हमर इलेक्ट्रिकच्या मास प्रोडक्शनचे काम सुरू करेल.

हमर बंद झाल्याचा फायदा इतर कंपन्याना झाला
 
जनरल मोटर्सची हमर लोकप्रिय एसयूवीपैकी एक आहे. ही आकाराला खूप मोटी, पॉवरफुल आणि बल्की दिसते. याच्या अट्रॅक्टिव लुकमुळे गाडीला अनेक चित्रपट आणि मुझीक व्हिडिओमध्येही वापरण्यात आल होते. आर्थिक मंदी आणि फ्यूलच्या वाढत्या किमतीमुळे कंपनीने 2010 मध्ये याचे प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. पण या दरम्यान यूएस मार्केटणध्ये एसयूवी आणि पिकअप ट्रकचा ट्रेंड वाढला. यातच हमर बंद झाल्यामुळे इतर कंपन्यानी याचा फायदा घेतला आणि बाजारात आपले पिकअप ट्रक लॉन्च केले.

टेस्लाच्या सायबरट्रकसोबत असेल टक्कर
 
नुकतंच इलेक्ट्रिक कार मेकर कंपनी टेस्लाने आपल्या इलेक्ट्रिक सायबरट्रकला सादर केले आहे. या गाडीला 100 किमी वेग पकडण्यासाठी फक्त 2.9 सेकंदाचा वेळ लागतो. याची किंमत 28 लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत असेल. आशा व्यक्त होत आहे की, जनरल मोटर्सच्या हमर इलेक्ट्रिक ट्रकची टक्कर टेस्लाच्या सायबरट्रकसोबत होऊ शकते. यासोबतच बॉलिंगर, कारमा आणि लॉर्डटाउन मोटर्स अशा मोठ्या ब्रँड्सनेही आपले पिकअप ट्रक बाजार आणले आहेत.

बातम्या आणखी आहेत...