Home | Business | Auto | hundai-to-launch-verna-in-new-look

ह्युंदाई नवी कार लिटरमध्ये चालणार २४ किलोमीटर

बिझनेस ब्यूरो | Update - May 20, 2011, 11:10 AM IST

ह्युंदाई मोटर्सने भारतील बाजारपेठेत व्हर्ना या आपल्या जुन्या मोटारीला नव्या स्वरुपात सादर केलंय.

  • hundai-to-launch-verna-in-new-look

    ऑटोमोबाईल जगतातील प्रख्यात कंपनी ह्युंदाई मोटर्सने भारतील बाजारपेठेत व्हर्ना या आपल्या जुन्या मोटारीला नव्या स्वरुपात सादर केलंय. या गाडीला फ्लुइडिक व्हर्ना असे नाव देण्यात आलंय. या गाडीला चार वेगवेगळ्या क्षमतेच्या इंजिनासोबत सादर करण्यात आलंय. त्यामध्ये डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही इंधनाचे पर्याय देण्यात आले आहेत.    व्हर्नाच्या वेगवेगळ्या मॉडेल्सची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ६.९९ लाख रुपयांपासून ते १०.७४ लाख रुपयांपर्यंत आहे. नव्या स्वरुपातील १.४ लिटरचे डिझेल इंजिन एक लिटरमध्ये २३.५ किलोमीटर अंतर कापू शकते, असा दावा कंपनीने केलाय. या मॉडेलची एक्स शोऱूम किंमत ८ लाख रुपये ठेवण्यात आलीये.    व्हर्नाच्या सर्व नव्या मॉडेल्समध्ये हायएंड म्युझिक सिस्टिम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, आयपॅड, ड्रायव्हर इन्फोर्मेशन सिस्टिम, रियर व्ह्यू कॅमेरा आणि सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग सिस्टम बसविण्यात आले आहे.Trending